ETV Bharat / state

ठाणे : पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादीची मोदींवर टीका; म्हणाले, 'अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!' - अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा राष्ट्रवादीची टीका ठाणे

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरड मोडले आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाण्यात हे बॅनर लावले आहेत. 'MAN OF THE MATCH पेट्रोल 100* नॉट आऊट अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!', असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे.

banner hoisted in thane over petrol price hike by ncp
पेट्रोल दरवाढीवरुन राष्ट्रवादीच्या मोदींना खोचक शुभेच्छा
author img

By

Published : May 28, 2021, 12:13 PM IST

Updated : May 28, 2021, 12:29 PM IST

ठाणे - पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असून आता या पेट्रोलच्या दराने १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याचाच निषेध करण्याकरता ठाण्यात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने '१०० नाॅट आऊट' असा भला मोठा बॅनर लावला आहे.

ठाण्यात लावण्यात आलेले बॅनर

कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे महागाईने कंबरड मोडले आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल दरवाढ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ठाण्यात हे बॅनर लावले आहेत. 'MAN OF THE MATCH पेट्रोल 100* नॉट आऊट अच्छे दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!', असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. ठाण्यातील हरी निवास चौकात हे बॅनर लावले गेले आहेत. या आधीदेखील पेट्रोल दरवाढी विरोधात बैलगाडी आंदोलन, सायकल आंदोलन, तर गाडी खिचो आंदोलन राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाने ठाण्यात केले आहेत.

हेही वाचा - मुंबईत आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; अनेक जिल्हा पेट्रोलचे दर शंभरीपार

सध्या कोरोनाच्या या परिस्थितीत अनेकांचा रोजगार गेला आहे. तर अनेकांचे उद्योगधंदेही ठप्प झाले आहेत. अशा परिस्थितीत पेट्रोलच्याही किमती वाढल्या आहेत. याचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणण्यानुसार, एका डॉलरची किंमत 70 रुपयांच्या जवळपास पोहोचली आहे. इंधन मागणी वाढल्याने सध्या तेलाची बाजारपेठ तेजीत असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्युटच्या आकडेवारीनुसार २१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत तेलाचा साठा ४.३९ दशलक्ष बॅरल आहे. त्यामुळे संपूर्ण आठवडा इंधनाला मागणी राहण्याची शक्यता आहे.

Last Updated : May 28, 2021, 12:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.