ठाणे - ठाणे महापालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीत कार्यरत असलेले लिपिक अमित गडकरी यांच्यावर अज्ञात हल्लेखोराकडून चोपरने हल्ला झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.
गडकरी हे मुंब्रा फायर ब्रिग्रेड ऑफिस जवळ फोनवर बोलत असताना दुचाकी वरून आलेल्या २ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खांद्यावर चोपरने हल्ला केला व दोघेही फरार झाले. गडकरी यांना त्वरित कळवा शिवाजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी मुंब्रा पोलिसात रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.