ETV Bharat / state

Knife Attack : वाढदिवसाच्या पार्टीत नाचण्यावरून वाद, एकाला चाकुने भोसकले - birthday party

वाढदिवसाच्या पार्टीत नाचण्यावरून ( Argument over dancing at a birthday party ) वाद झाल्याने शेजाऱ्याने चाकुने भोसकल्याची ( stabbed with a knife ) घटना घडली आहे. उल्हासनगरमधील सुभाष टेकडी भागात ही घडली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ( Vitthalwadi Police Station ) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Knife Attack
Knife Attack
author img

By

Published : Nov 30, 2022, 7:11 PM IST

ठाणे : वाढदिवसाच्या पार्टीत नाचण्यावरून ( Argument over dancing at a birthday party ) वाद झाल्याने शेजाऱ्याने चाकूने भोसकल्याची ( neighbor stabbed him with a knife ) घटना समोर आली आहे. ही घटना उल्हासनगरमधील सुभाष टेकडी भागात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात विविध ( Vitthalwadi Police Station ) कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुणाल राहुल वाहूळ (वय १८) असे गुन्हा दाखल झालेल्या हल्लेखोर शेजाऱ्याचे नाव आहे. तर सागर मधुकर गायकवाड (वय २५) असे गंभीर जखमी शेजाऱ्याचे नाव आहे.

नाचणाऱ्यांना धक्कबुक्की - उल्हासनगर मधील सुभाष टेकडी भागातील रामजी आंबेडकर नगर परिसरात जखमी सागर राहतो. तर त्याच्या शेजारी आरोपी कुणाल राहत असून २८ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सागरचा मित्र राजू बनकर यांच्या नातवाचा वाढदिवस होता. त्यामुळे जखमी सागर हा ४ ते ५ मित्रांसोबत घरासमोरील अंगणात संगीताच्या तालावर नाचत होता. त्यातच रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास आरोपी कुनालही या ठिकाणी येऊन नाचणाऱ्यांना धक्कबुक्की करत होता. यावरून सागरने त्याला हटकून सांगितले कि, तुला नाचायचे असले तर, व्यवस्थित नाच, नाही तर निघून जा असे बोलताच आरोपीने याचा राग अल्याने त्याने चाकु हल्ला केला. यात सागर गंभीर जखमी झाला आहे.

हल्लोखोर पसार - या घटनेनंतर हल्लोखोर कुणाल घटनास्थळावरून पळून गेला. तर गंभीर जखमी अवस्थेत सागराला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. हल्लोखोर कुणालवर सागरच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३०७, ३२३, ५०४,सह ३७ (१) १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक जी. आर. गाडेकर करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.