ठाणे : राज्यातील ७ हजार ७५० ग्रामपंचात निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर ( Announcement of Gram Panchayat Elections ) केला. यामध्ये मुख्यमंत्र्याच्या जिल्हयातील ४२ ग्रामपंचात निवडणुकीचा ( Gram Panchayat Election ) समावेश आहे. विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात ठाणे जिल्हातील १५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या निकालात शिंदे ( Eknath Shinde ) गटाने सर्वाधिक ४२ ग्रामपंचायतवर झेंडा फडकवला, तर ठाकरे गटाने ४० ग्रामपंचायतवर कब्जा मिळविण्यात यश आले होते. आता पुन्हा ग्रामीण भागात निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याने सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाले आहे.
४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार - ठाकरे गट, शिंदे गटातील सत्ता संघर्षानंतर गेल्याच महिन्यात जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १५८ पैकी ३१ सरपंच बिनविरोध निवडणून आले होते. मात्र पुन्हा जाहीर केलेल्या ग्रामपंचात निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील १४ , मुरबाड तालुक्यातील १४ तर कल्याण तालुक्यातील ९ तसेच शहापूर तालुक्यातील ५ अशा ४२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे गटात सामना रंगणार असल्याचे गेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरून दिसून येते.
१८ डिसेंबरला मतदान - २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ असेल, तर दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुद्दत ७ डिंसेबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यत असेल. त्यानंतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप होईल. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच पर्यत मतदान होणार आहे. तर २० डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत.
शिंदे गटाचे वर्चस्व - गेल्या महिन्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाने जोरदार मुसंडी मारली होती. तर मनसेने खाते उघडत दोन ग्रामपंचायतीवर झेंडा फडकावला होता. तसेच शिंदे गटाला ४२ तर भाजपालाही २५ ठिकाणी यश मिळाले आहे. तर ठाकरे गटाला ४० ग्रामपंचायतीवर झेंडा फडविकण्यात यश मिळाले होते.