ETV Bharat / state

Amrita Fadnavis रामायण काळापासून आदिवासी समाजाचे देशासाठी योगदान

author img

By

Published : Aug 16, 2022, 3:13 PM IST

Updated : Aug 16, 2022, 3:24 PM IST

असंख्य अदिवासी बांधवांनी प्रभूराम यांच्यासोबत राहून त्यांना साथ दिली शिवाय महाराणा राणाप्रताप यांच्या हलदीघाटच्या लढाईत आदिवसांनी साथ दिल्याने त्यांचा विजय झाला होता पण हे सर्व आपल्याला ठाऊक नाही त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यामुळे तुमच्या मूलभूत हक्कासाठी कोणाकडेही भीक मागण्याची गरज नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amrita Fadnavis यांनी भिवंडीत केले

Amrita Fadnavis
Amrita Fadnavis

ठाणे रामायण काळापासुन आदिवासी समाजाचे देशाच्या प्रत्येक वाटचालीत योगदान असून हनुमान सुग्रीव शबरी यांच्यासह असंख्य अदिवासी बांधवांनी प्रभूराम यांच्यासोबत राहून त्यांना साथ दिली शिवाय महाराणा राणाप्रताप यांच्या हलदीघाटच्या लढाईत आदिवासांनी साथ दिल्याने त्यांचा विजय झाला होता पण हे सर्व आपल्याला ठाऊक नाही त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे त्यामुळे तुमच्या मूलभूत हक्कासाठी कोणाकडेही भीक मागण्याची गरज नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amrita Fadnavis यांनी भिवंडीत केले श्रमजीवी संघटनेनेच्या वतीने भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे स्वातंत्र्योत्सव पार पडला या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख अतिथी होत्या

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस

'हजारो आदिवसी बांधव स्वातंत्र्याच्या प्रकाशापासून वंचित' : श्रमजीवी संघटनेला स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या प्रत्येक क्रांतिकारकाचा अभिमान आहे. गांधीजी, भगतसिंग, राजगुरू, राघोजी भांगरा, नाग्या कातकरी असो वा सुभाषचंद्र बोस, स्वातंत्र्यवीर सावरकर असो सगळेच क्रांतिकारक आम्हाला वंदनीय आहेत. म्हणूनच गेली चार दशक संघटना स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करत आहे. आज आलेले हजारो बांधव स्वातंत्र्याच्या प्रकाशापासून वंचित असलेले देशवासी आहे. मात्र तरीही तिरंगा आणि त्यामागचा त्याग त्यांना ज्ञात आहे. संघटना स्वातंत्र्याची किरण आदिवासी गरीब दुर्बल बांधवांच्या घरात, झोपडीत पोहचावी म्हणून लढत असलेल्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईतील या सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती आणि त्याग केलेल्या विरांना दिलेली ही मानवंदना आहे असे यावेळी संस्थापक आणि राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा ) विवेक पंडित यांनी सांगितले.

श्रमजीवीच्या झेंडावंदनाला संघर्षमय इतिहास : या अभिनव झेंडावंदनाला एक संघर्षमय इतिहास आहे. 1983 -84 पासून जातीयवादी सावकारी मानसिकतेचा प्रस्थापितांचा विरोध डावलून संघटनेचे संस्थापक विवेक आणि विद्युलता पंडित यांनी झेंडावंदन कार्यक्रम सुरू केला होता. वसईतील देपिवली गावात ही सुरुवात झाली. तेव्हापासून हा कार्यक्रम गेली 36 वर्षे अविरत सूरु आहे. उत्सवात पालघर, ठाणे, रायगड आणि नाशिक जिल्हयातील सुमारे 15 हजार सभासद सहभागी झाले होते. गेली 36 वर्षे अखंडपणे चढत्या आलेखाने स्वातंत्र्य दिनाचा उत्सव गणेशपूरी येथे होत असतो. 10 वर्षाचे बालकार्यकर्तेपासून तर 80 वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वच यात सहभागी होता.

हेही वाचा - Rupali Patil Vs Fadnavis पंतप्रधानांच्या आवाहना नुसार फडणवीस राजीनामा देणार का

Last Updated : Aug 16, 2022, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.