ETV Bharat / state

अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण - AMBARNATH POLICE STATION SANITIZED

कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाणे कार्यालय सॅनिटाईझ करण्यात आले असून, अंबरनाथमध्ये कोरोनाबधितांची संख्या 9 झाली आहे .

AMBARNATH POLICE STATION SANITIZED
अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण
author img

By

Published : May 2, 2020, 11:08 PM IST

ठाणे - अंबरनाथ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 30 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली असून, त्याच्या संपर्कात आलेल्या 5 कर्मचाऱ्यांना देखील क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संपूर्ण पोलीस ठाणेही सॅनिटाईझ करण्यात आले आहे.

अंबरनाथ पोलीस ठाण्यात मुंबईहून काही कामानिमित्त आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हे समजल्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्यातील जे 10 ते 12 पोलीस या कोरोनाबाधित पोलिसाच्या संपर्कात आले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये अंबरनाथ पोलीस ठाण्यातील 30 वर्षीय पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. तर या पोलिसाच्या संपर्कात असलेल्या 5 पोलीस कर्मचाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाणे कार्यालय सॅनिटाईझ करण्यात आले असून, अंबरनाथमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 9 झाली आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.