ठाणे - राज्यात कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्य सरकारने पुन्हा कडक लॉकडाऊन करण्याची तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे समाजातील तिसरा घटक म्हणून मान्यता मिळालेल्या तृतीयपंथ्यांची लॉकडाऊनमुळे होणारी व्यथा मांडण्यासाठी उल्हासनगरच्या एका तृतीयपथ्यांने समाजमाध्यमावर व्हिडिओ व्हायरल करून राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
उल्हासनगरच्या तृतीयपथ्यांने समाजमाध्यमावर मांडलेली व्यथा गेल्या लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांचे हाल - उल्हासनगर शहराला उद्योग नगरी म्हणून ओळखले जाते. या शहरात मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी राहतात. गेल्या लॉकडाऊनमध्ये ६ महिने कसबसे काढले आहे. आता मात्र पुन्हा राज्य सरकार लॉकडाऊन करणार असल्याच्या बातम्या पाहून उल्हासनगर मधील महेक वाघ या तृतीयपंथ्याने समाजमाध्यमावर एक व्हिडिओ व्हायरल करून तृतीयपंथी समाजाच्या वतीने राज्य सरकारकडे लॉकडाऊन काळात उद्भवणाऱ्या समस्या मांडत सरकराचे लक्ष वेधले आहे. महेकच्या म्हणण्यानुसार व्यापारी संघटनासह इतरही समाजातील घटक फक्त त्यांचाच विचार करतात. मात्र आमच्या समाजाकडे नेहमीच शासन दुर्लक्ष करीत आले आहे.
तर आमच्या समजाने जगायचे कसे?
पुन्हा लॉकडाऊनची कडक अंमलबजाणी झाली तर आमच्या समजाने जगायचे कसे? असा प्रश्न उपस्थित करून लॉकडाऊनमध्ये आमच्या समाज घटकाला किमान अन्नधान्य सरकराने दिले पाहिजे, विशेष म्हणजे आजही आमच्या मधील काही तृतीयपथ्यांकडे शिधावाटप, आधारकार्ड नाहीत. त्यामुळे शासनाने शिधावाटप, आधारकार्ड मिळून दिल्यास अन्नधान्य मिळून किमान पोटाला आधार तर मिळेल असे 'ई टीव्ही भारत' च्या प्रतिनिधीशी बोलताना महेक याने राज्य सरकारकडे मागणी केली आहे.
हेही वाचा - अवघ्या ३ तासांत अपहरण झालेल्या मुलाची पोलिसांनी केली सुटका