ETV Bharat / state

१५ वर्षे राज्य केले मात्र आम्ही सुडाचे राजकारण केले नाही -  अजित पवार - ajit pawar in thane

आमदारकीचा राजीनामा आणि ईडीच्या घडलेल्या नाट्य घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी मुरबाडमधील जाहीर सभेत भाजप सरकारवर सडकून टीका केली. ते मंगळवारी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते.

अजित पवार
author img

By

Published : Oct 1, 2019, 8:50 PM IST

Updated : Oct 1, 2019, 9:31 PM IST

ठाणे - आम्ही १५ वर्षे राज्य केले, मात्र कधीही सुडाचे राजकारण केले नाही. या भाजप सरकारने पवार साहेबांना कुठलाही संबध नसताना ईडीची नोटीस बजावून लोकशाहीला नख मारण्याचे काम केले आहे, अशी टीका अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

मुरबाड येथील सभेत बोलताना अजित पवार

आमदारकीचा राजीनामा आणि ईडीच्या घडलेल्या नाट्य घडामोडीनंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी मुरबाडमधील जाहीर सभेत भाजप सरकारवर सडकून टीका केली. ते मंगळवारी मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. यावेळी मुरबाड शहरात प्रचाराच्या रॅलीने सुरुवात करत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मुरबाड मधील एका सभागृहात अजित पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांचेच आमदार म्हणतात दारूला बाईचे नाव द्या म्हणजे दारू खपेल, तर आमच्या वेळी आर. आर. आबांनी डान्सबारवर बंदी घातली होती. त्यानंतर गुटख्यावरही बंदी घातली होती. आता यांच्या राज्यात काय सर्वच सुरू आहे.

हेही वाचा - भाजपमध्ये बंडखोरी? यादीत नाव नसतानाही एकनाथ खडसेंचा उमेदवारी अर्ज दाखल

अजित पवार शेवटी म्हणाले की, हे भाजपवाले जाती जातीय तणाव निर्माण करत आहेत. राम मंदिर यांना आठवले की समजा निवडणूक आली. मागेही शिवसेनावाले अयोध्येला जाऊन पूजा करून आले पण काही झाले नाही. तर संभाजी भिडेवरही अजित पवार यांनी शेलक्या शब्दात टीका केली. संभाजी भिडे यांना उद्देशून ते म्हणाले की झाडाचा आंबा खाऊन मुलगा झाला असता तर आमची गरजच लागली नसती. मग पुरुष कशाला आहेत? या शेलक्या शब्दात वर्णन करून संभाजी भिडे गुरुजी वर टीका केली. प्रचारसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाईं आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - मनसेकडून पहिल्या 27 उमेदवारांची यादी जाहीर

Intro:kit 319

Body:15 वर्ष राज्य केलं मात्र आम्ही सुडाचे राजकारण केलं नाही , तर भाजप सरकाराने लोकशाहीला नख मारण्याचे काम करीत आहेत,, अजित पवार

ठाणे : 15 वर्ष राज्य केलं मात्र आम्ही कधीही सुडाचे राजकारण केलं नाही, मात्र या भाजप सरकारने पवार साहेबांना कुठलाही संबध नसताना त्यांना ईडीची नोटीस बजावून या सरकारने लोकशाहीला नख मारण्याचे काम केल्याची टीका अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर केली,
आमदारकीचा राजीनामा आणि ईडीच्या घडलेल्या नाट्य घडामोडी नंतर पहिल्यांदाच अजित पवारांनी मुरबाड मधील जाहीर सभेत भाजप सरकारवर सडकून टीका केली, ते आज मुरबाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हिंदुराव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते, यावेळी मुरबाड शहरात प्रचाराच्या रॅलीने सुरुवात करत उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यानंतर मुरबाड मधील एका सभागृहात अजित पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांचेच आमदार म्हणतात दारूला बाईचं नाव द्या म्हणजे दारू खपेल, तर आमच्या वेळी आर आर आबांनी डान्सबारवर बंदी घातली होती त्यानंतर गुटख्यावरही बंदी घातली होती, आता यांच्या राज्यात काय सर्वच सुरू आहे,
अजित पवार शेवटी म्हणाले की हे भाजपवाले जाती जातीय तणाव निर्माण करत आहेत थांब मंदिर यांना आठवलं की समजा निवडणूक आली मागेही शिवसेनावाले जाऊन पूजा करून आले पण काही झाले नाही, तर संभाजी भिडे वर ही अजित पवार यांनी शेलक्या शब्दात टीका केली संभाजी भिडे आणि उद्देशून म्हणाले की झाडाचा आंबा खाऊन मुलगा झाला असता तर आमची गरजच लागली नसती, मग पुरुष कशाला आहेत, या शेलक्या शब्दात वर्णन करून संभाजी भिडे गुरुजी वर टीका केली,
प्रचारसभेत कॉग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई, आणि आघाडीतील इतर घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Conclusion:मुरबाड
Last Updated : Oct 1, 2019, 9:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.