नवी मुंबई - तृप्ती देसाई इंदोरीकर महाराजांच्याविरुद्ध गेल्या तर त्यांचं तोंड काळं करु, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अध्यक्ष अजय सिंह सेंगर यांनी दिला आहे. तसेच, तृप्ती देसाई यांनी हिंदू धर्मात लुडबुड करु नये, असे वक्तव्यही सेंगर यांनी केले आहे.
इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. मात्र, या वक्तव्याचे काही लोक समर्थन तर काही लोक विरोध करत आहेत.
निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी माफी मागितल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे. त्यामुळे इंदोरीकरांविरोधात गेलात तर तोंडाला काळं फासू, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेने तृप्ती देसाई यांना दिला आहे.