ETV Bharat / state

...तरीही आंदोलनकांनी केले संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन

नागरिकत्व कायद्याविरोधी 'आम्ही भारतीय लोक' आंदोलन समितीतर्फे होणाऱ्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये येऊन संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले.

Thane
आंदोलनकर्त्यांनी केले संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन
author img

By

Published : Feb 2, 2020, 10:32 AM IST

ठाणे - 'आम्ही भारतीय लोक'च्या नागरिकत्व कायद्याविरोधी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही आंदोलकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

आंदोलनकर्त्यांनी केले संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन

हेही वाचा - भिवंडीत बैल चोरणाऱ्या त्रिकुटाला जमावाची बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

नागरिकत्व कायद्याविरोधात 'आम्ही भारतीय लोक' आंदोलन समितीतर्फे कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये 1 फेब्रुवारीपासून धरणे आंदोलन करण्यात येणार होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला कल्याणातील वकिलांच्या बार संघटनेने पाठिंबा दिला होता. मात्र, धरणे आंदोलन टाळण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिसांनी महानगरपालिकेला आंदोलनासाठी उद्यान देऊ नये असे पत्र दिले. परिणामी, महापालिकेने उद्यान देण्यास नकार दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती.

धरणे आंदोलनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी 8 दिवसापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरलिका व महात्मा फुले चौक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, पोलिसांनी परवानगी दिली नसल्याचे त्यांनी गृहमंत्री देशमुख यांना सांगतिले होते.

हेही वाचा - उल्हासनगरात रेशनच्या काळ्या बाजाराचा भांडाफोड; दक्ष नागरिकाने गहू पकडला

त्यातच आंदोलन करू नये, म्हणून समितीच्या पदाधिकाऱ्यांना 149 कलमान्वये पोलिसांनी नोटिसी बजावल्या होत्या. तरी देखील आंदोलनकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबडेकर उद्यान्यात अंदोलन करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. दरम्यान, आता हे आंदोलन शिवाजी चौकात करणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगितले.

Intro:kit 319Body:.. तरीही आंदोलनकर्त्यांनी नारेबाजी करून संविधानाच्या प्रस्तावनांचे केले वाचन

ठाणे : नकारिकत्व कायद्याविरोधी आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरी देखील आंदोलनकर्ते नकार दिलेल्या ठिकाणी येऊन केंद्र सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत भारतीय संविधानाच्या प्रस्तावनांचे वाचन केले. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नागरिकत्व कायद्याविरोधात आम्ही भारतीय लोक आंदोलन समितीतर्फे कल्याणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानमध्ये उद्या 1 फेब्रुवारीपासून नागरिक धरणे आंदोलन करणार होते. विशेष म्हणजे या आंदोलनाला कल्याणातील वकीलांच्या बार संघटनेने पाठींबा दिला आहे. मात्र धरणे आंदोलन टाळण्यासाठी महात्मा फुले चौक पोलिसांनी महानगरपालिकेला आंदोलनासाठी उद्यान देऊ नये असे पत्र दिले. परिणामी महापालिकेने उद्यान देण्यास नकार दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांवर नाराजी व्यक्त केली होती.
धरणे आंदोलनासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आठ दिवसापूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरलिका व महात्मा फुले चौक पोलिसांकडे परवानगी मागितली होती. तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन लोकशाही मार्गाने आम्ही अंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी परवानगी दिली नसल्याचे त्यांनी गृहमंत्री देशमुख यांना सांगतिले होते. त्यातच अंदोलन करून नये म्हणून समितीच्या पदाधिकाऱ्यांना 149 कलमान्वये पोलिसांनी नोटिसी बजावल्या होत्या. तरी देखील आंदोलनकर्त्यानी डॉ. बाबासाहेब आंबडेकर उद्यान्यात अंदोलन करून भारतीय संविधानाच्या प्रस्तावनांचे वाचन केले. दरम्यान, उद्यापासून हे आंदोलन शिवाजी चौकात करणार असल्याचे आंदोलनकर्त्यानी सांगितले.

Conclusion:kalyan
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.