ठाणे - एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ठाण्यातील आनंद दिघे आश्रम आणि धर्मवीर आनंद दिघे शक्ती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले. यावेळी ठाण्यातील शिवसेनेचे सर्व नेते, कार्यकर्ते, आमदार आणि खासदार उपस्थित होते. त्यांनी जल्लोष करत मंत्रिपद मिळाल्याचा आनंद वक्त केला.
आनंद दिघेंच्या नावाचा केला शपथ घेताना उच्चार -
ठाण्यात शिवसेना वाढवण्यात आणि सेनेला पहिली सत्ता मिळवून देण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आनंद दिघे यांचा सहभाग होता. बाळासाहेब अनेकदा वर्तमान पत्रातील समस्यांच्या बातम्या वाचून आनंद दिघे यांना फोन करत असत. एकनाथ शिंदे हे देखील आनंद दिघे यांचेच शिष्य असल्यामुळे त्यांनी शपथविधीच्या वेळी दिघे यांची आठवण केल्यामुळे शिवतीर्थावर जल्लोष झाला होता.
ठाणे नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सतिश प्रधान हे असताना ठाणेकरांनी केलेल्या मागणीनुसार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कलाप्रेमी संकल्पनेतून 1978 साली राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाची निर्मिती करण्यात आली. दरम्यान, नगरपरिषदेच्याच काळात दादोजी कोडंदेव स्टेडियमची निर्मिती करण्यात आली. तर त्याच दरम्यान शहरात आनंद दिघे यांचा शिवसेनेतील दबदबा वाढला. ठाणे जिल्हा हा पूर्वीचा जनसंघ आणि नंतरचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु, शिवसेनेचे तत्कालीन जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी जिल्ह्यात चांगले संघटन बांधले आणि भाजपकडून ठाण्यात शिवसेनेची सत्ता आणली.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंसह या ६ जणांचा होणार शपथविधी