ETV Bharat / state

पदवीधर निवडणुकीनंतर भाजपने मतदारांचा कौल ओळखायला हवा - नाना पटोले - All India Congress Committee

भाजपने पदवीधर मतदारसंघात झालेल्या पराभवाची दखल घेतली नाही. भाजप कसा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. खोटे बोला, पण रेटून बोला, अशी भाजपची भूमिका असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. तसेच, भाजपने आता जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

Nana Patole criticizes BJP
नाना पटोले
author img

By

Published : Jan 21, 2021, 9:40 PM IST

ठाणे - भाजपने पदवीधर मतदारसंघात झालेल्या पराभवाची दखल घेतली नाही. भाजप कसा आहे, हे आता जनतेला कळू लागले आहे. खोटे बोला, पण रेटून बोला, अशी भाजपची भूमिका असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. तसेच, भाजपने आता जनतेच्या मनातील कौल ओळखला पाहिजे, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

प्रतिक्रिया देतान काँग्रेस नेते नाना पटोले

हेही वाचा - ठाण्यात 483 पक्षांचा मृत्यू; कोरोनानंतर बर्ड फ्ल्यूच्या शिरकावाने नागरिक चिंतित

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव संजय दत्त यांच्या घरी पटोले यांनी सदिच्छा भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका केली.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला जागा कळेल

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला आपली जागा समजून येईल, असा गर्भित इशारा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला दिला. आताच्या ग्रामपंचायत निवडणूक निकालावरूनही त्यांना समजत नसेल, तर त्याला काही अर्थ नाही, असे पटोले यांनी सांगितले.

महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याबाबत चर्चा नाही

आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकत्र लढायचे, की वेगवेगळे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नसल्याने त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता, पक्ष जो आदेश देईल त्याचे पालन करणे आपली जबाबदारी असून त्याला आपण चांगल्या प्रकारे न्याय देऊ, असे सांगत हायकमानचा निर्णय मला मान्य असल्याचेही पटोले यांनी सांगितले.

जिल्हा काँग्रेसतर्फे जंगी स्वागत

सदिच्छा भेटीवेळी कल्याण जिल्हा काँग्रेसतर्फे नाना पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. युवक काँग्रेस उपाध्यक्ष ब्रिज दत्त, काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, उपाध्यक्ष विमल ठक्कर, यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा - आत्महत्येच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.