नवी मुंबई- वारंवार आवाहन करुनही वाहनचालक महामार्गावर सर्रास नियमभंग करीत आहेत. त्यामुळे वाढते अपघात रोखण्यासाठी अपयश येत आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महामार्ग पोलीस परिमंडळ 2 च्या माध्यमातून तीस दिवसांत 18 हजार पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर वेग मर्यादेचे उल्लंघन हे अपघातांचे सर्वात मोठे कारण आहे. या बेशिस्त वाहनचालकांना चाप बसावा व राज्यातील महामार्गावरील अपघातांचे प्रमाण कमी व्हावे. यासाठी वाहतूक अप्पर पोलीस महासंचालक भुषण उपाध्याय यांनी दिलेल्या सूचनेनुसार सप्टेंबर महिन्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती.
त्यानुसार इंटरसेप्टर वाहनाद्वारे व मुंबई पुणे दरम्यान बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अतिवेगाने चालविण्यात येणाऱ्या 10 हजार 115 वाहनांवर व सीटबेल्ट न लावणे, वाहन चालविताना संभाषण करणे, लेन कटिंग, काळ्या काचा, रिफ्लेटर नसणाऱ्या 8 हजार 10 वाहने, अशा एकूण 18 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - हाथरस प्रकरण : आरोपींच्या उलट्या बोंबा; म्हणे पीडितेच्या आई-भावानेच केली हत्या