ठाणे : भिवंडीत आगीचे सत्र सुरु असून आज दुपारच्या सुमारास एका केमिकल गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील देशमुख कंपाउंड येथे केमिकल गोदामाला लागली आहे. या गोदामात घातक रासायनिक साठा साठवला होता. आगीची घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भिवंडी अग्निशामक दलाच्या २ गाड्या दाखल आहे. तर या भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहे.
केमिकलमुळे रौद्ररूप : हि आग एवढी भीषण होती कि, या आगीचे लोट परिसरात पसरून नागरिकांचे डोळे चुरचुरत होते. तर काहींना घश्याना त्रास होत असल्याचे सांगितले. या आगीची घटना भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयात मिळताच घटनस्थळी अग्निशमनचे जवान गाड्यासह दाखल होऊन या आगीवर आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. मात्र केमिकलच्या गोदामात असलेल्या काही ज्वालाग्राही घातक केमिकलमुळे अग्नी रौद्ररूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचे केमिकलचे ड्रम जळून खाक असून सध्याच्या अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवत असल्याचे अग्निशमन अधिकारी पवार यांनी सांगितले आहे.
अग्नितांडव थांबणार कधी ? : भिवंडीतील यंत्रमाग कारखाने, गोदामांना वारंवार आगी लागण्याचे सत्र सुरुच आहे. त्यात गोदामांना कारखान्याला लागलेल्या आगीच्या निमित्ताने भिवंडीतील अग्नितांडव थांबणार कधी ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष ? भिवंडीत मोती कारख्यांनासह यंत्रमाग कारखाने, गोदामे, तसेच डाइंग, सायजिंग यांना आगी लागण्याच्या घटना वारंवार घडत असतात. मात्र, महापालिका, पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही या आगींच्या घटनांकडे पुरता दुर्लक्ष होत आहे. भविष्यात मोठी दुर्घटना घडल्या त्यास जबाबदार कोण ? असा सवाल निर्माण झाला.
हेही वाचा -
Jayant Patil ED probe: हजर राहण्याकरिता १० दिवसांची मुदत द्या-जयंत पाटील यांची ईडीला विनंती