ETV Bharat / state

गाडीखाली पैसे पडल्याचे बतावणी करून शेतकऱ्याला लुटले; ८६ हजार लंपास

संदीप आणि त्यांचे मित्र न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी परतताना नौपाडा परिसरात खरेदीसाठी आले होते. गावदेवी परिसरात कार पार्क करून ठाकरे गाडीत बसून होते, तर, त्यांचे दोघे मित्र खरेदीसाठी गेले होते.

गाडीखाली पैसे पडल्याचे बतावणी करून शेतकऱ्याला लुटले
author img

By

Published : Mar 18, 2019, 11:13 PM IST

ठाणे - पैसे पडल्याची बतावणी करून ८६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. भिवंडी तालुक्यातील कुकसे गावातील शेतकरी संदीप ठाकरे हे आपल्या मित्रांसमवेत कारमधून न्यायालयीन कामकाजासाठी शनिवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.

संदीप आणि त्यांचे मित्र न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी परतताना नौपाडा परिसरात खरेदीसाठी आले होते. गावदेवी परिसरात कार पार्क करून ठाकरे गाडीत बसून होते, तर, त्यांचे दोघे मित्र खरेदीसाठी गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास एका भामट्याने ठाकरे यांचे लक्ष वेधून घेत गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले. ठाकरे जेव्हा पैसे उचलण्यासाठी गाडीखाली उतरले असता, त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडील तिघा भामट्यांनी गाडीमधील बॅग लांबवली. या बॅगेत 80 हजाराची रोकड आणि ५ हजारांचे घड्याळ आणि इतर सामान असा एकूण ८६ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ४ अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Intro:गाडीखाली पैसे पडल्याचे सांगून शेतकऱ्याला लुटले Body:

कारच्या खाली पैसे पडल्याचे सांगत लुटणाऱ्या चौघा भामट्यांचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत.भिवंडी तालुक्यातील बोरिवली,कुकसे गावातील तरुण संदीप ठाकरे हे शेतकरी आपल्या दोघा मित्रांसमवेत कारने न्यायालयीन कामकाजासाठी शनिवारी ठाण्यात आले होते.तेव्हा,कामकाज आटोपून सायंकाळी परतताना नौपाडा परिसरात खरेदीसाठी आले.नौपाडा,गावदेवी परिसरात गाडी पार्क करून ठाकरे गाडीत बसून राहिले.तर,त्यांचे दोघे मित्र खरेदीसाठी गेले होते. तेव्हा,रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गाडीजवळ आलेल्या एका भामट्याने गाडीच्या काचेवर टकटक करून ठाकरे यांचे लक्ष वेधून घेत गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले.त्यानुसार,खाली पाहिले असता खरोखरच 10 रुपयांच्या 12 नोटा पडल्याचे दिसले.म्हणून ठाकरे यांनी गाडीतून उतरून खाली पडलेले 120 रुपये उचलून गाडीत बसले.काही वेळानंतर त्यांचे दोघे मित्र खरेदी करून परतल्यावर गाडीमध्ये डाव्या सीटवर ठेवलेली बॅग गायब दिसली.तेव्हा,या चोरीचा उलगडा झाला.ठाकरे जेव्हा पैसे उचलण्यासाठी गाडीखाली उतरले तेव्हा,याचवेळी दुसऱ्या दिशेकडील तिघा भामट्यानी गाडीमधील बॅग लांबवली.या बॅगेत 80 हजाराची रोकड व पाच हजारांचे घड्याळ व इतर सामान असा एकूण 86 हजाराचा मुद्देमाल चोरटयांनी लांबवून पळ काढला.याप्रकरणी नौपाडा पोलिसात चार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपाससहाय्यक पोलीस निरीक्षक एच. जी. ओउळकर करीत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.