ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोनाचे 57 नवे रुग्ण, तर 27 जण कोरोनामुक्त - नवी मुंबई कोरोना रूग्ण

नवी मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी नवी मुंबईत 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 20, 2020, 8:34 AM IST

नवी मुंबई - उपनगरात कोरोनाचा कहर वाढत असून, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवारी नवी मुंबईत 57 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर 27 रुग्ण बरे होऊन घरी परतले.

नवी मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहराने धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आत्तापर्यंत 1 हजार 332 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी 11 जण हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत.

नवी मुंबईत 8 हजार 867 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 6 हजार 762 जण निगेटीव्ह आले असून, 784 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहेत. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 321 इतकी आहे. मंगळवारी 57 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात तुर्भेमधील 15, बेलापूरमधील 3, कोपरखैरणेमधील 5, नेरुळमधील 12, वाशी व घणसोलीमधील प्रत्येकी 8, ऐरोलीमधील 6 रुग्णांचा समावेश आहे.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 510 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. मंगळवारी नेरूळमधली 6, वाशीमधील 3, तुर्भेमधील 2, कोपरखैरणेमधील 1, घणसोलीमधील 5, ऐरोलीमधील 6 आणि दिघ्यातील 4 अशा एकूण 27 व्यक्ती कोरोना मुक्त झाल्या. शहरात सद्यस्थितीत 772 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.