ETV Bharat / state

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 564 नव्या कोरोना रुग्णांची भर ; एकूण रुग्ण संख्या 8 हजार 49 वर

author img

By

Published : Jul 4, 2020, 8:27 AM IST

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 215 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 4 हजार 704 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी आढळून आलेल्या 564 रुग्णापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यत महापालिका हद्दीत एकूण रुग्णसंख्या 8 हजार 49 वर पोहोचली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका
कल्याण डोंबिवली महानगरपालिका

ठाणे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. शुक्रवारी 564 नवे रुग्ण आढळले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण रुग्णसंख्या 8 हजार 49 वर पोहोचली आहे. तर कोरोना रुग्णाचा प्रादुर्भाव मोठा प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यांसह उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये वाढल्याचे दिसून आले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आतापर्यंत 130 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 हजार 215 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तब्बल 4 हजार 704 रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी आढळून आलेल्या 564 रुग्णापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यत महापालिका हद्दीत एकूण रुग्णसंख्या 8 हजार 49 वर पोहोचली आहे.

लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यानंतर गेल्या आठ दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने वाढ झाली आहे. आरोग्य विभागासह संबंधित यंत्रणाही हतबल झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी आढळून आलेल्या रुग्णांची विगतवारी पाहता सर्वाधिक रुग्णांची संख्या डोंबिवली पूर्व परिसरात 174 रुग्ण, कल्याण पूर्वेत 114, कल्याण पश्चिममध्ये 157, डोंबिवली पश्चिमेत 76 ,टिटवाळा - मांडा परिसरात 17 व मोहने गावात 15 असे एकूण एकाच दिवशी 564 रुग्णांची विक्रमी नोंद झाल्याने शहरातील परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्याचे दिसून आले.

दरम्यान, महापालिका हद्दीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोनाबाधित रूग्णांसाठी महापालिकेतर्फे रूग्णवाहिका सेवा पुरविण्यात येत आहेत. नागरिकांना अधिक तत्परतेने रूग्णवाहिकांची सेवा उपलब्ध करून देण्याच्या दष्टीकोनातून केंद्रीकृत रूग्णवाहिका प्रणाली महापालिकेतर्फे सुरू करण्यात आली आहे.

रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी महापालिका मुख्यालयातील वॉररूमकडून ०२५१-२२११३७३ , ०२५१-२२०११६८ हे दुरध्वनी क्रमांक यापूर्वीच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 24 तास सुरू असणाऱ्या मुख्यालयातील वॉररूममध्ये नागरिकांच्या सोयीसाठी आता २२११८६२, २२११८६३, २२११८६४, २२११८६५, २२११८६६ हे ५ दूरध्वनी क्र. नव्याने कार्यान्वित करण्यात आले आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.