ETV Bharat / state

Fraud In Thane : ३०० कोटींची फसवणूक; ४ हजार गुंतवणूकदार सहा वर्षांपासून हवालदिल

Fraud In Thane : गुंतवणुकीच्या अमिषाने गुंतवणूकदारांची तब्बल 300 कोटींची फसवणूक (300 Crore Fraud) करण्यात आल्याचा प्रकार बदलापूर शहरात उघडकीस आला आहे. यामध्ये 4 हजार गुंतवणूकदारांना आरोपीनं गंडवलं आहे.

Fraud In Thane
गुंतवणूकदारांची फसवणूक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 8, 2023, 6:21 PM IST

माहिती देताना गुंतवणूकदार

ठाणे Fraud In Thane : जिल्ह्यातील बदलापूर शहरात सहा वर्षांपूर्वी म्हणजे 2017 साली सागर इन्व्हेस्टमेंट (Sagar Investment) या कंपनीकडून राज्याच्या विविध शहरातील तब्बल 4 हजार गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली होती. सुमारे 300 कोटींपेक्षा जास्त रकमेची ही फसवणूक आहे. मात्र अजूनही त्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या या गुंतवणूकदारांनी अखेर उल्हासनगर प्रांत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक : विशेष म्हणजे फसवणूक करणाऱ्या कंपनीने ज्यादा व्याजदर देण्याचं आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केली होती. त्यानंतर 2018 मध्ये फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या मालकासह त्याची पत्नी आणि साथीदारांना पोलिसानी अटकही केली होती. मात्र घटनेला सहा वर्ष झाली तरी परतावा अद्यापही मिळाला नाही. त्यामुळं हजारो गुंतवणूकदारानी आक्रमक पावित्रा घेतला आहे. तर गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक गुंतवणूकदार आपले हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी संघर्ष करत आहेत.

सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीत गुंतवणूक : मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूर या शहरातील तब्बल ४ हजार गुंतवणूकदारांची सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीत तब्बल ३०० कोटींची गुंतवणूक केली होती. विशेष म्हणजे फसवणूक झालेल्यापैकी सर्वाधिक गुंवणूकदार निवृत्त अधिकारी कर्मचारी आहेत. जादा व्याजदराच्या अमिषाला बळी पडून शासकीय सेवा निवृत्तीनंतर मिळालेली लाखोंची रक्कम वयोवृद्ध नागरिकांनी आपली सगळी पुंजी या सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये गुंतवली होती. मात्र सहा वर्षात त्यांना परतावा न मिळाल्यानं हे वयोवृद्ध नागरिक हताश झाले आहेत.

कंपनीच्या मालकाला अटक : या प्रकरणी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीचे मालक श्रीराम समुद्र, सुहास समुद्र यांच्यासह आणखी काही जणांना अटक झाली होती. आता यातील आरोपी हे जामीनावर बाहेर आहेत. मात्र या आरोपी समुद्र कुटुंबीयांची मालमत्ता प्रशासनाने लिलावात काढून लवकरात लवकर गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे अशी मागणी गुंतवणूकदार करत आहेत. याप्रकरणी प्रशासन काहीच हालचाल करत नसल्यानं गुंतवणूकदारांनी उल्हासनगर प्रांत कार्यालया समोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यानं गुंतवणूकदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडेही त्यावेळी तक्रार केली होती. तसंच आता ईडी कार्यलयातही काही महिन्यापूर्वी फसवणूक करणाऱ्या कंपनी विरोधात तक्रार दिल्याचं गुंतवणूकदार सांगतात.

हेही वाचा -

  1. GRB Scam Beed : धक्कादायक! बीडमध्ये 100 दिवसात दीड पट रक्कम देण्याचे आमिष दाखवणाऱ्या जीआरबीचा घोटाळा
  2. Sahara Refund Portal Launch : सहारात अडकलेले पैसे मिळवून देण्याकरिता अमित शाह यांच्याकडून पोर्टल लाँच, 'अशी' आहे प्रक्रिया
  3. Sensex Nifty jump over 1 pc : शेअर बाजार सावरला पण अदानींची घसरण सुरूच, सेन्सेक्सनी घेतली 909 अंकांनी उसळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.