ETV Bharat / state

खारबाव रेल्वे स्थानकात पूल दुरुस्तीदरम्यान अपघात; ११ मजुरांचे प्राण वाचले - रेल्वे प्रशासन

खारबांव रेल्वे स्टेशनवरील लोखंडी पादचारी पुलाच्या दुरुस्तीदरम्यान तीन मोठे स्फोट झाले. यावेळी पुलाच्या वरच्या भागात ११ मजूर काम करीत होते. परंतु, सुदैवाने त्यांना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या अक्षम्य घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.

खारबाव रेल्वे स्थानकात पूल दुरुस्तीदरम्यान अपघात
author img

By

Published : May 7, 2019, 9:10 PM IST

ठाणे - वसई-दिवा मार्गावर असलेल्या खारबाव रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची दुरुस्ती सुरू असताना रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीचा संपर्क आला. त्यामुळे तीन मोठे स्फोट झाले. यावेळी पुलाच्या वरच्या भागात ११ मजूर काम करीत होते. परंतु, सुदैवाने मजूरांना कोणतीही हानी झाली नाही. दरम्यान, या अक्षम्य घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.

खारबाव रेल्वे स्थानकात पूल दुरुस्तीदरम्यान अपघात

वसई-दिवा रेल्वे मार्गावरील खारबाव रेल्वे स्थानक येथून शेकडो प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. या स्थानकावर ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पादचारी पूल कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. त्या दुरुस्तीचा ठेका एका मुंबईतील खासगी ठेकेदाराला देण्यात आला. मात्र, या ठेकेदाराने १५ दिवस उलटूनही दुरुस्तीच्या कामात प्रगती केलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील ट्रेनमध्ये बसण्यासाठी अथवा उतरणाऱ्या प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडूनच प्रवास करावा लागत आहे.

यादरम्यान जलदगतीने धावणाऱ्या मालगाडी अथवा एक्सप्रेसची धडक लागून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पादचारी पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी तसेच पुलाच्या दुरुस्ती दरम्यान झालेल्या विद्युत स्फोटांची चौकशी करावी आणि ठेकेदारावर रेल्वेप्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी विशाल पाटील यांनी केली आहे.

खारबांव रेल्वे स्थानकात ब्रिज दुरुस्तीदरम्यान अपघात; सुदैवाने ११ मजुरांचे प्राण वाचले 

ठाणे :- वसई - दिवा मार्गावरील खारबांव रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाचे काम मजूरांकडून लोखंडी एंगलची वेल्डिंग सुरु असताना रेल्वेच्या उच्च दाब वाहिनीचा संपर्क आला. त्यावेळी तीन मोठे स्फोट झाले. मात्र सुदैवाने पुलाच्या वरच्या भागात ११ मजूर काम करीत असताना हे स्फोट होऊनही  मजूर सहीसलामत बचावले. मजूरांचे नशीब बलवत्तर म्हणून त्यांचे प्राण वाचले आहेत. या अक्षम्य घटनेची रेल्वे प्रशासनाने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

खारबांव रेल्वे स्टेशनवरील लोखंडी पादचारी पुलाची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पुलाच्या सुरु केलेल्या  दुरुस्तीचे काम पुढे सरकत नसल्याने नाईलाजाने रेल्वे प्रवाश्यांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. वसई - दिवा रेल्वे मार्गावरील खारबांव रेल्वेस्टेशन येथून शेकडो प्रवासी दैनंदिन प्रवास करीत आहेत. या स्टेशनवर ३० वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला पादचारी पूल कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे. त्या दुरुस्तीचा ठेका एका मुंबईतील खाजगी ठेकेदाराला देण्यात आला आहे. मात्र या ठेकेदाराने पंधरा दिवस उलटूनही दुरुस्तीच्या कामात प्रगती केलेली नाही. त्यामुळे रेल्वेस्टेशन वरील ट्रेनमध्ये बसण्यासाठी अथवा उतरणाऱ्या प्रवाश्यांना बाहेर पडण्यासाठी रेल्वेरूळ ओलांडूनच प्रवास करावा लागत आहे. या दरम्यान जलदगतीने धावणाऱ्या मालगाडी अथवा एक्सप्रेसची धडक लागून मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पादचारी पुलाची दुरुस्ती लवकरात लवकर करून पुलाच्या दुरुस्ती दरम्यान झालेल्या विद्युत स्फोटांची चौकशी करून  ठेकेदारावर  रेल्वेप्रशासनाने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे.       

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.