ठाणे : मुलींच्या सुरक्षितेच्या मुद्यावर चिंता व्यक्त केली जात असताना दुसरीकडे डोंबिवली मध्ये हादरवणारी घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका 22 वर्षीय नराधमाने 6 वर्षाच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हि घटना डोंबिवली पूर्वेकडील आयरेगावातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून, पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे. कुंदन रवींद्र चौहान असे अटक नराधमाचे नाव आहे.
आरोपी मूळचा उत्तरपदेशचा: पीडित अल्पवयीन मुलगी कुटुंबासह डोंबिवली पूर्वे भागातील आयरेगावातील एका चाळीत राहते. तर नराधम आरोपी हाही त्याच चाळीत शेजारी राहतो. विशेष म्हणजे आरोपी नराधम हा मूळचा उत्तरपदेश मधील आजमगडचा रहिवाशी आहे. तो काही दिवसापूर्वीच आयरेगावातील नातेवाईकाकडे आला होता. त्यातच 5 मे रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरा बाहेर दिसली होती. त्यावेळी तिला बहाण्याने करून नराधम त्याच्या घरात घेऊन गेला. त्यानंतर घराचा आतून दरवाजा बंद करत तिच्यावर लैगिंक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असतानाच, पीडितीचे आई तिला शोध होती. त्यावेळी मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने तिला बंद घराचा ठोकला असता, पीडित मुलगी रडतच बाहेर आली होती. त्यानंतर आईला संशय आल्याने मुलीकडे चौकशी केली असता, तिने घडलेला प्रसंग आईला सांगितला,
पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल: आईने तातडीने पीडित मुलीला घेऊन डोंबिवली पोलीस ठाणे गाठून मुलीवर घडलेल्या प्रसंगाचे कथन करताच, पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी नराधमावर विनयभंगासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ७ मे रोजी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकून त्याला न्यायालयात हजर केले. तर आरोपीला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास डोंबिवली पोलीस करत आहेत.
याआधीही लैगिंक अत्याचाराची घटना: यापूर्वी ही एप्रिल २०२२ रोजी साडेचार वर्षाच्या पीडित मुलीवर नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने लैगिंक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पीडित अल्पवयीन मुलगी कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुटूंबासह राहते. तिच्याच शेजारी नऊ वर्षाचा अल्पवयीन मुलगा राहत असून त्याने ३ एप्रिल २०२२ रोजी दुपारच्या सुमारास खेळण्याच्या बहाण्याने पीडित मुलीला घराच्या मागच्या बाजूला नेऊन तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर काही दिवसांनी पीडित मुलीला लैगिंक अत्याचारामुळे त्रास झाल्याने तिच्याकडे आईने चौकशी केली असता, हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर १५ एप्रिल २०२२ रोजी पीडितेच्या आईने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन शेजारी राहणाऱ्या नऊ अल्पवयीन मुलाविरोधात भादंवि कलम ३७६ सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
हेही वाचा -