ETV Bharat / state

Rape on Minor Girl : कारागृहात बंद असलेल्या आईला जामीन मिळवून देण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर बलात्कार - आईला कारागृहातून जामीन देण्याच्या बहाण्याने मुलीवर बलात्कार

१४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईला कारागृहातून सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच तिच्या तोंड ओळखीचा असलेल्या आरोपीच्या तावडीत सापडली. त्यानंतर आरोपीने तुझ्या आईला जामीन मिळवून देऊन बाहेर काढतो, असे सांगितले. यावर पीडितेने विश्वास ठेवला. याचाच फायदा घेत आरोपीने पीडितेशी जवळकी साधली होती.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
author img

By

Published : Nov 29, 2021, 9:21 PM IST

ठाणे - एका गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या महिलेच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आईला कारागृहातून जामीनवर सोडण्याच्या बहाण्याने एका नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नराधम आरोपीविरोधात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. प्रदीप असे अटक आरोपीचे नाव आहे.

आईला कारागृहातून सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आरोपीच्या तावडीत

पीडित मुलगी मुंबईतील मानखुर्द परिसरात कुटूंबासह राहते. तर पीडितेची आई अमलीपदार्थ विक्री व बाळगण्याच्या प्रकरणी पोलिसांनी तिला अटक केले होते. त्यानंतर न्यायालयाने पीडितेच्या आईची कारागृहात रवानगी केली. तेव्हापासून ती कारागृहात शिक्षा भोगत असतानाच तिची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आईला कारागृहातून सोडविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच तिच्या तोंड ओळखीचा असलेल्या आरोपीच्या तावडीत सापडली. त्यानंतर आरोपीने तुझ्या आईला जामीन मिळवून देऊन बाहेर काढतो, असे सांगितले. यावर पीडितेने विश्वास ठेवला. याचाच फायदा घेत आरोपीने पीडितेशी जवळकी साधली होती.

आई जामीनावर कारागृहातुन सुटल्यानंतर घटना आली समोर

पीडितेच्या विश्वास संपादन केल्याने आरोपीने तिला ३० ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घरी पूजा असल्याचा बहाणा करून मानपाडा हद्दीत असलेल्या घरी घेऊन आला. त्यानंतर तिच्यावर घरातच बळजबरीने बलात्कार केला. दरम्यानच्या कालावधीत पीडितेची आई जामीनावर कारागृहातुन सुटली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर ३३ वर्षीय पीडितेच्या आईने बलात्कार झालेल्या हद्दीतील मानपाडा पोलीस ठाण्यात काल (रविवारी) धाव घेऊन पीडितेवर घडलेल्या प्रसंगाचे कथन केले. यावर पोलिसांनी आरोपी प्रदीपवर कलम ३७६, ३७६(३) सह पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे आरोपी नराधमाला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहे. आज आरोपीला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Murder of BJP office bearer : युनियनच्या वादातून भाजपा पदाधिकाऱ्याची हत्या, सहा तासात संशयित गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.