नवी मुंबई- खारघर मधील पांडवकडा धबधबा हा धोकादायक धबधबा म्हणून प्रशासनाने घोषित केला आहे. या धबधब्यावर जाऊ नये म्हणून पोलिसांकडून प्रवेश बंदी आदेश देखील जारी केलेला आहे. मात्र वर्षा पर्यटानाचा आनंद घेण्यासाठी रविवारी तब्बल 117 पर्यटक नियम मोडून या गोल्फ क्लब परिसरातील धबधब्यावर गेले होते. पंरतु अचनाक पावसाचा जोर वाढल्याने धबधब्याच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढली आणि हे सर्व पर्यटक अडकून पडले. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अग्निशमन दलाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन करून या पर्यटकांची सुटका केली आहे.
नियम तोडून धबधब्यावर गेलेल्या 117 पर्यटकांना पाण्याने वेढले, अग्निशामक दलाने केली सुटका - water fall water
रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी असल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह कमी होता. मात्र, दुपारी १२ नंतर मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानकपणे वाढू लागला. त्यामुळे तेथील पर्यटकांना धबधब्याचा प्रवाह ओलांडून सुरक्षित स्थळी जाणे अशक्य झाले. या ठिकाणी तब्बल 117 पर्यटक अडकले होते.