ETV Bharat / state

World Tourism Day 2021: चाळीस वर्षानंतरही उजनी पर्यटन विकास दुर्लक्षितच -अरविंद कुंभार

उजनी धरण नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. राज्यातील इतर धरणांच्या तुलनेत उजनी धरणाचा पर्यटन विकास हा जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही मागास आहे. तसेच धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून लोक येथे येतात. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज असल्याचे मत उजनी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले आहे.

World Tourism Day: Forty years later, Ujani tourism development neglected
World Tourism Day : चाळीस वर्षानंतरही उजनी पर्यटन विकास दुर्लक्षित
author img

By

Published : Sep 27, 2021, 10:58 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - जिल्ह्यामध्ये धार्मिक पर्यटन परिपूर्ण संपन्न आहे. उजनी धरणाच्या पर्यटनाचा विषय अजूनही कागदावरच असल्याचे दिसतो. उजनी धरण नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. राज्यातील इतर धरणांच्या तुलनेत उजनी धरणाचा पर्यटन विकास हा जलपर्यटन आणि कृषी पर्यटन या दृष्टीनेही मागास आहे. तसेच धरण पाण्याने पूर्ण भरल्यानंतर तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातून लोक येथे येतात. याचा पर्यटनवाढीसाठी उपयोग करून घेण्याची गरज असल्याचे मत उजनी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी व्यक्त केले आहे.

उजनी अभ्यासक अरविंद कुंभार यांची प्रतिक्रिया

उजनी पर्यटन विकासासाठी शासनाकडून हालचाली -

40 वर्षाखालील सोलापुरातील दुष्काळी जनतेचा विचार करून तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाची निर्मिती केली. पुणे सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर पसरलेली उजनी पर्यटनदृष्ट्या अधिकच महत्त्वाची ठरली आहे. धरणामुळे तीन जिल्ह्यातील 2 लाख 49 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली आले आहे. दळणवळणाच्या या सोयीसोबतच परिसरातील अनेक गोष्टी पर्यटनवाढीला मदत करणाऱ्या आहेत. उजनी धरण जलाशयाचा निसर्गरम्य परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत असून ४३ हेक्टर क्षेत्रावर पर्यटन केंद्र उभा करण्याच्या गतिमान हालचाली सुरू आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनीही उजनीच्या पर्यटनासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भविष्यात उजनी जलाशय पर्यटन केंद्र म्हणून देखील वरदान ठरू शकते.

उजनी पर्यटन विकासाची संधी -

पुणे सोलापूर महामार्गावरील उजनी धरण लागूनच बांधण्यात आली आहे. उजनी जलाशयांमध्ये उत्तम प्रकारे पर्यटन स्थळ म्हणून निर्माण करावे. उजनी जलाशयावर देशविदेशातील पक्ष्यांचे थवे येत असतात. उजनी परिसरात आपण फिरलो तर अनेक स्थलांतरित पक्षी अद्याप येथे मुक्कामी असल्याचे दिसून येते. अशा विविध नैसर्गिक समृद्ध असलेल्या उजनीचा अद्यापही पर्यटन विकास झाला नाही. उजनी जलाशयावर मच्छीमारांच्या नौका, पर्यटनवाढीला चालना दिल्यास या ठिकाणी मोठ्याप्रमाणात रोजगार निर्माण होईल, त्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे. उजनी धरण पर्यटनाविषयी जनजागृती व्हावी, अशा विविध अनुषंगाने उजनी पर्यटन विकासावर पक्षी तज्ञ व उजनी अभ्यासक अरविंद कुंभार यांनी मत मांडले.

हेही वाचा - World Tourism Day : पर्यटनाची राजधानी असलेले औरंगाबाद सोयी-सुविधांपासून वंचित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.