ETV Bharat / state

हंगामी मजुरी वाढीसाठी यंत्रमाग कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मजुरीमध्ये हंगामी ५० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी 'लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन'च्या वतीने गुरूवारी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

यंत्रमाग कामगारांचे आंदोलन
author img

By

Published : Mar 1, 2019, 2:57 PM IST

सोलापूर - यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मजुरीमध्ये हंगामी ५० टक्के वाढ द्यावी, या मागणीसाठी 'लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन'च्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले.

सुधारित किमान वेतन जाहीर झालेले आहे. मात्र, या सुधारित किमान वेतनानुसार कामगारांना वेतन मिळत नाही, वेतनाचा प्रश्न 'टाईम रेट' की, 'पीस रेट', या प्रश्नावर अडकलेला आहे. हा प्रश्न सुटेपर्यंत कामगारांना हंगामी ५० टक्के वाढवावी, अशी मागणी सिटूच्या वतीने यावेळी करण्यात आली.

यंत्रमाग कामगारांचे आंदोलन

सोलापुरात एकट्या यंत्रमाग उद्योगात ४० हजार यंत्रमाग कामगार काम करत आहेत. एकाच शेडखाली चालणाऱ्या या कारखान्याच्या मालकांनी वेगवेगळे युनिट दाखवून कामगारांवर अन्याय केला आहे. यामुळे कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळत नव्हते. याविरोधात कामगार संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवल्यानंतर २९ जानेवारी २०१५ रोजी सुधारित किमान वेतन जाहीर केले होते. तसेच राज्य शासनाने त्याची अधिसूचना देखील काढली. मात्र, त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.

लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने पुकारण्यात आलेला हा संप कामगारांचे मतदान घेऊन पुकारण्यात आला. यावेळी एकूण १२ हजार ८०६ कामगारांनी मतदान केले होते. त्यातील ११ हजार ८३३ कामगारांनी संपाला पाठिंबा दिला आणि ९७३ कामगारांनी संपाला विरोध केला होता. त्यामुळे ९५ टक्के कामगारांनी संपाला पाठिंबा दिल्यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनने हा संप करत असल्याचे गुरुवारी जाहीर केले.

Intro:R_MH_SOL_03_28_LAL_BAVTA_ANDOLAN_S_PAWAR

हंगामी मजुरीवाढीसाठी लाल बावटा च्या आंदोलन
50% मजुरीवाढ मिळाल्यास बेमुदत संपाचा इशारा

सोलापूर-
यंत्रमाग उद्योगात काम करणाऱ्या कामगारांना मजुरीमध्ये हंगामी 50 टक्के वाढ द्यावी या मागणीसाठी लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन करण्यात आले सुधारित किमान वेतन जाहीर झालेले आहे मात्र या सुधारित किमान वेतनानुसार कामगारांना वेतन मिळत नाही वेतनाचा प्रश्न टाईम रेट की पीस रेट या प्रश्नावर अडकलेला आहे हा प्रश्न सुटेपर्यंत कामगारांना हंगामी 50% वाढवावी अशी मागणी सिटूच्या वतीने आली आहेत.

Body:सोलापूर शहरे कामगाराची शहर असून सोलापुरात एकट्या यंत्रमाग उद्योगात 40000 यंत्रमाग कामगार काम करीत आहेत एकाच शेडखाली चालणाऱ्या या कारखान्याची मालकांनी वेगवेगळे युनिट दाखवून कामगारांवर अन्याय केलेला आहे यामुळे कामगारांना किमान वेतनानुसार वेतन मिळत नव्हते याविरोधात कामगार संघटनांनी मोठ्या प्रमाणावर आवाज उठवल्यानंतर 29 जानेवारी 2015 रोजी सुधारित किमान वेतन जाहीर करून राज्य शासनाने त्याची अधिसूचना देखील काढली होती परंतु 2015 रोजी काढलेल्या सुधारित किमान वेतनानुसार कर्मचाऱ्यांना मिळण्याची अमलबजावणी होऊ शकली नाही किमान वेतनाचा प्रश्न टाईम रेट की पीस रेट यावर आधारलेला आहे.
कामगारांना मिळणाऱ्या मजुरीचा व त्यांच्या कष्टाचा सारासार विचार करून व त्याचा अभ्यास करून लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन सोलापूरच्या वतीने 30 रेट वर आधारित किमान वेतन संदर्भात प्रस्ताव सादर करण्यात आला होता कामगारांना मिळणारे किमान वेतन हे ईश्वर असावे अशी मागणीही च्या वतीने सरकारकडे करण्यात आलेली आहे एकीकडे महागाई प्रचंड वाढत असताना कामगारांना त्यांच्या मजुरीवर करण्यात आलेली नाही मागील मजुरीचा करार संपून दीड वर्षे झालेले आहेत कामगाराकडून मोठ्या प्रमाणात या मजुरी वाढीची मागणी होत असताना लालबावटा यंत्रमाग युनियन च्या वतीने ही मागणी वारंवार लावून धरण्यात आली होती मात्र या मागणीकडे कारखानदारांनी लक्ष दिले नसल्यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि आजपासून बेमुदत बंद पुकारण्यात आला आहे.
लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन च्या वतीने पुकारण्यात आलेला हा संप कामगाराचे मतदान घेऊन कौल घेण्यात आला आणि त्यानंतर हा बंद पुकारण्यात आलेला आहे एकूण 12806 कामगारांनी मतदान केले होते त्यातील 11 हजार 833 कामगारांनी संपाला पाठिंबा दिला आणि 973 कामगारांनी संपाला विरोध केला होता त्यामुळे 95% कामगारांनी संपाला पाठिंबा दिल्यामुळे लालबावटा यंत्रमाग कामगार युनियन हे संप करत असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.