ETV Bharat / state

जय सिद्धेश्वर ठरतील का सोलापूरचे 'योगी'? भाजप राबवू पाहतोय युपी पॅटर्न

जय सिद्धेश्वर स्वामींचा राजकारणाशी आजवर काहीही संबंध नाही. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धर्म प्रसार करण्यात घालवले आहे. पण, त्यांना उमेदवारी देण्यामागे मतांचे गणीत असल्याचे बोलले जात आहे.

author img

By

Published : Mar 24, 2019, 12:21 PM IST

डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी

सोलापूर - भारतीय जनता पक्षाने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लिंगायत धर्मगुरू डॉ. जय सिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. आतापर्यंत भाजपने देशभरात अनेक अध्यात्मिक धर्मगुरुंना संसदेत पाठवले आहे. उत्तर प्रदेशात तर योगी आदित्यनाथ थेट मुख्यमंत्रीपदी बसले आहेत. सोलापुरात देखील भाजप हाच युपी पॅटर्न राबवत असल्याचे बोलले जात आहे. हा पॅटर्न यशस्वी होईल की नाही हे येणारा काळच ठरवेल.

सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून भाजपने जय सिद्धेश्वर यांना सुशिलकुमार शिंदेंच्या विरोधात उतरवले आहे. त्यामुळे बनसोडे नाराज आहेत. पण, नागरिकात सुद्धा यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जय सिद्धेश्वर स्वामींचा राजकारणाशी आजवर काहीही संबंध नाही. आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी धर्म प्रसार करण्यात घालवले आहे. पण, त्यांना उमेदवारी देण्यामागे मतांचे गणीत असल्याचे बोलले जात आहे.

कोण आहेत डॉ. जय सिद्धेश्वर?

जय सिद्धेश्वर स्वामी यांचा जन्म १ जून १९५५ ला रुद्रम्मा आणि गुरुबसय्या हिरेमठ यांच्या घरात झाला. स्वामींना बनारस हिंदू विद्यापीठातून 'वीरशैव एवम काश्मिर शैवदर्शनमे मोक्षका' या विषयावर पीएचडी केली आहे. १९८९ साली त्यांनी गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र संस्थेची स्थापना केली. १९९१ मध्ये गौडगाव येथे श्री जगद्गुरुपंचाचार्य प्रशाला सुरू केली. तसेच, अक्कलकोट शहरात बीबीए आणि बीसीए महाविद्यालय आणि यतेश्वर पब्लिक स्कूल, नूतन प्राथमिक मराठी शाळेची स्थापना केली. एका मागासवर्गीय वसतीगृहाची स्थापनाही केली.

सिद्धेश्वर स्वामींना मराठीसह कन्नड, तेलगू, हिंदू या भाषा अवगत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे. याचा फायदा भाजपला निवडणुकीत होऊ शकतो. सामाजिक कामातूनही स्वामी लोकांच्या संपर्कात असतात. माशाळ व गौडगाव येथील संस्कृती केंद्रे, शेळगी येथील शिवयोगीधाम, हिरेमठ संस्थान यांच्या मार्फत स्वामींचे सामाजिक काम चालते.

Intro:सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून भाजपने डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांना उमेदवारी दिलीय.मोदी लाटेत देशाच्या तत्कालीन गृहमंत्र्याला पराभूत केलेल्या खासदार शरद बनसोडे यांना घरी बसवत भगव्या वस्त्रातल्या लिंगायत धर्मगुरुला भाजपनं उमेदवारी दिलीय. ते लिंगायत मतांवर डोळा ठेवून. दुस-या बाजूला सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात दलित मतांच्या ध्रुविकरणासाठी अँड. प्रकाश आंबेडकरांना उतरवून महास्वामींना निवडणून आणू असा कयास पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी लावलाय. तसं पाहिलं तर जयसिद्धेश्वर यांचा राजकारणाशी काडीमात्रही संबंध नसून ते अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव मठाचे प्रमुख आहेत. आयुष्यभर अंगावर भगवी वस्त्रे नेसून या स्वामींनी संत साहित्य अन् धर्म प्रवचन हेच कार्य अंगिकारले होते. त्यांनी धर्मशास्त्रात पीएचडी केली असून कन्नड, मराठी, तेलुगू, हिंदी यासह अनेक भाषा त्यांना अवगत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत म्हणजे 2014 साली भाजप नव्या चेहऱ्याच्या शोधात होता; त्यावेळीही यांच्या नावाची कुजबूज सुरू झाली होती. मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे जातीची वैध प्रमाणपत्रे सविस्तर नसल्याने त्यांचे नाव मागे पडले. अन् त्यांनीही त्यावेळी राजकारणात उतरण्याबाबतची ठाम भूमिका घेतली नव्हती.आगामी लोकसभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडणूक लढवणार आहेत. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे तिकीट कापत भाजप ने डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांना सोलापूर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे.Body:कोण आहेत महास्वामी

शिवाचार्यरत्न श्री. ष. ब्र . डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौडगाव संस्थानचे संस्थापक आहेत. १ जून १९५५ रोजी त्यांचा जन्म झालं असून आजमितीला त्यांचे वय ६३ आहे. त्यांचे शिक्षण एसएससी महाराष्ट्र बोर्ड पुणे, त्यानंतर १९७८-७९ साली त्यांनी बनारस हिंदू विश्व विद्यालयातून बी. ए. , १९८१-८२ मध्ये याच विद्यालयातून एम. ए. आणि याच विद्यालयातून १९८८-८९ साली त्यांनी एम. ए. पी. एचडी . पदवी संपादन केली आहे. वीरशैव एवंम काश्मीर शैवदर्शनमे मोक्षका चिंतन या विषयावर त्यांनी पी. एच. डी. केली आहे. त्यांच्या आईचे नाव रुद्रम्मा हिरेमठ आणि वडिलांचे नाव गुरुबसय्या हिरेमठ आहे.महास्वामींनी १२ जून १९८९ साली श्री. गुरुसिद्धमल्लेश्वर कल्याण केंद्र ट्रस्टची स्थापना केली आहे. १९९१ मध्ये त्यांनी गौडगाव येथे श्री. जगद्गुरूपंचाचार्य प्रशाला सुरु केली . अक्कलकोट शहरात बी. बी. ए . व बी. सी. ए . महाविद्यालय व यतेश्वर पब्लिक स्कुल आणि नूतन प्राथमिक मराठी शाळा सुरु केली आहे. गौडगाव येथे मागासवर्गीय वसतिगृह सुरु करण्यात आले आहे. याशिवाय माशाळ व गौडगाव येथे संस्कृती केंद्राची स्थापना केली आहे. शेळगी सोलापूर येथे शिवयोगीधाम या अध्यात्मिक केंद्राची त्यांनी स्थापना केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या ठिकाणी महास्वामींनी मराठी, कन्नड व हिंदी भाषेतून विविध विषयांवर आशीर्वचन दिले आहे. अध्यात्मिक गुरु म्हणून ते सर्वांना परिचित आहेत. संस्थान हिरेमठ व शिवयोगी धाम सेवा समितीच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी विविध धार्मिक, सामाजिक , शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शेतीविषयकसुद्धा त्यांचे कार्य असून बी-बियाणे , ऊस लागवड , तूर हरभरा पेरणी व संरक्षण याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. पशुपालक व गोपालन विषयसुद्धा त्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. दरवर्षी ते सिद्धश्रीरत्न पुरस्कार प्रदान सोहळ्याचेही आयोजन करतात. Conclusion:सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटक व आंध्र प्रदेशात महास्वामींचे असंख्य भक्तगण आहेत. त्यामुळं भाजपनं हा युपी पॅटर्न पायलट प्रोजेक्ट आणला आहे पुरोगामी महाराष्ट्रात आणला आहे. त्याला सोलापूरकर कसा प्रतिसाद देतात. ते या निवडणूकीनंतरचं स्पष्ट होईल.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.