हैदराबाद Multiple sclerosis : मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) या आजाराशी लढा देत असलेल्या लोकांमध्ये काही विशिष्ट कॅन्सरचं प्रमाण लक्षणीय वाढल्याचं नवीन संशोधनात दिसून आल आहे. या घातक रोगांमध्ये मूत्राशय, मेंदू आणि गर्भाशय ग्रीवाच्या कर्करोगाचा समावेश होतो, असं फ्रान्समधील रेनेस विद्यापीठाच्या एका संशोधक पथकानं सांगितलं.
"मल्टिपल स्क्लेरोसिस (MS) ग्रस्त नागरिकांच्या अधिक चाचण्या केल्यामुळं इतर रोगांची शक्यता वाढते," असं संशोधक इमॅन्युएल लेरे यांनी सांगितलं. "आम्हाला काही प्रकारचे कर्करोग आणि MS यांच्यात एक संबंध आढळलाय. ज्याचं स्पष्टीकरण एखाद्या व्यक्तीचं वय आणि कर्करोगाच्या प्रकारांवर अवलंबून असू शकतं." लेरे यांनी जोर दिला, तथापि, "एकंदरीत, आमच्या अभ्यासात कर्करोगाचा वाढलेला धोका खूपच कमी असल्याचं आढळून आलं." हा आभ्यास न्युरोलॉजी जर्नलमध्ये 9 ऑक्टोबर रोजी प्रकाशित झालाय.
हा अभ्यास एका प्रमुख फ्रेंच राष्ट्रीय आरोग्य सेवा डेटाबेसच्या रेकॉर्डवर केंद्रित आहे. लेरेच्या संशोधक गटानं MS असलेल्या सुमारे 1 लाख 41 हजार नागरिकांचा आभ्यास केला. तसंच त्यांनी न्यूरोलॉजिकल आजार नसलेल्या जवळजवळ 5 लाख 63 नागरिकांच्या कर्करोग निदानाच्या दरांची तुलना केली. अभ्यासापूर्वी किमान तीन वर्षे प्रत्येकजण कर्करोगमुक्त होता, असं संशोधनात दिसून आलं. नंतर सरासरी आठ वर्षे त्यांचा डाटा ट्रॅक केला गेला. त्या काळात सुमारे 40 हजार जणांना कर्करोग झाल्याचं दिसून आलं.
अभ्यासात असं आढळून आलंय, की ज्यांना मल्टिपल स्क्लेरोसिस नाही अशा लोकांच्या तुलनेत मल्टिपल स्क्लेरोसिस असलेल्या लोकांमध्ये कर्करोग होण्याची शक्यता 6% वाढली आहे. त्यात मूत्राशय कर्करोग 71%, ब्रेन ट्यूमर 68%, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग 24%नं वाढत असल्याचा धोका दिसून आला. या संशोधनात प्रोस्टेट कर्करोगाचा धोका 20% कोलोरेक्टल कर्करोगासाठी 10% आणि स्तनाच्या कर्करोगाचा 9% कमी असल्याचं संशोधकांनी नमुद केलंय.
"कोलोरेक्टल आणि स्तनाच्या कर्करोगाचा कमी धोका काही प्रमाणात MS असलेल्या कमी लोकांना अधिक वयात कॅन्सरची तपासणी करून घेता येऊ शकतो. जेव्हा त्यांना MS ची लक्षणे अधिक जाणवू शकतात," Leray यांनी सांगितलं. " यावर अधिक संशोधनाची गरज आहे. कर्करोगाची तपासणी कशी भूमिका बजावू शकते याकडं अधिक बारकाईनं पाहण्याची गरज आहे."
मेंदूच्या कर्करोगाच्या जोखमीवरील शोध देखील सूक्ष्म होता, असंही ते म्हणाले. "आमच्या अभ्यासात मेंदूच्या कर्करोगाचा धोका जास्त असल्याचं आढळून आलं असलं तरी, MS ग्रस्त लोकांमध्ये हे काही अंशी आधी आढळू शकतं कारण त्यांच्याकडं नियमितपणं मेंदूचे स्कॅन्स केलं जातं. ज्यामुळं एखाद्या व्यक्तीला लक्षणे दिसण्यापूर्वी कर्करोग लवकर ओळखता येतो".
इतर दोन ट्यूमर प्रकारांबद्दल, "एमएस असलेल्या लोकांमध्ये वारंवार मूत्रमार्गात संक्रमण होणं आणि इम्युनोसप्रेसंट औषधांचा वापर त्यांच्या मूत्राशय आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या उच्च जोखमीस कारणीभूत ठरू शकतो,". हा अभ्यास MS मुळं कर्करोग होतो किंवा टाळण्यास मदत होते; हे सिद्ध करू शकला नाहीय.
हे वाचंलत का :