ETV Bharat / politics

राज्यात आज सात दसरा मेळावे, निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव

दसऱ्याच्या सणाचं औचित्य साधत राजकीय पक्षांकडून दसरे मेळावे आयोजित केले जातात. यावर्षी महाराष्ट्रात पाच तर मुंबईत दोन दसरा मेळावा संपन्न होणार आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

दसरा मेळावे
dasara 2024 (Source - ETV Bharat Maharashtra)

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजू शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीमधील घटक पक्षांकडून सभा आणि मेळावांच्या सपाटा सुरु आहे.
दसऱ्याचे औचित्य साधत यावर्षीदेखील परंपरेनुसार राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र, यावर्षी महाराष्ट्रात तब्बल सात दसरा मेळावे पार पडणार आहेत.

  1. शाही दसरा मेळावा महाराष्ट्रातील शाही दसऱ्याची परंपरा कोल्हापूर येथे पाहायला मिळते. राज गादीचा मान असलेला या सोहळ्यात छत्रपती शाहू महाराज आणि संभाजी राजे छत्रपती यांच्यासह शाहू महाराजांच्या कुटुंबियांकडून हा दसरा मेळावा साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील सायंकाळी सात वाजेच्या सुमाराचा हा दसरा मेळावा पार पडणार आहे. पंचक्रोशीतील सामान्य जनता सोन लुटण्यासाठी कोल्हापूर नगरीत दाखल होत असते.
  2. ठाकरे गटाचा दसरा मेळावा- शिवसेना संस्थापक, हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची मुंबईतील शिवाजी पार्क मधील दसरा मेळाव्याची परंपरा आजही सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे शिवतार्थावरून शिवसैनिकांना कोणता आदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शिवसेना ठाकरे पक्षाकडून दसरा मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे.
  3. शिवसेना शिंदेंचाही दसरा मेळावा - अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर शिंदे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील शिवसैनिकांना कोणत्या सूचना देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
  4. भगवान गडावरील दसरा मेळावा- भाजपाने नेते गोपीनाथ मुंडे यांनी सुरुवात केलेल्या भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा आजतागायत देखील सुरू आहे. तब्बल 12 वर्षानंतर मंत्री धनंजय मुंडे आणि भाजपाच्या विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात बहीण भाऊ एकत्र पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या वेळेचा भगवानगडावरील दसरा मेळावा हा समाज बांधवांसाठी विशेष असणार आहे.
  5. बहुजनांचा दसरा मेळावा - भाजपाचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही वर्षांमध्ये दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. धनगर समाजाचे नेते म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बहुजनांचा दसरा मेळावा हा सांगली जिल्ह्यातील बिरोबा बन आरेवाडी येथे संपन्न होणार आहे. सध्या धनगर आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यात धनगर समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजात समाजातून धनगर समाजाला आरक्षण नको, अशा प्रकारची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी शिरवळ यांनी केली. त्यामुळे धनगर समाज आणि आदिवासी समाज यांच्यात दुफळी निर्माण झाल्याच्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर धनगर समाजासाठी आरेवाडीच्या दसरा मेळाव्यातून काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
  6. मनोज जरांगेंचा दसरा मेळावा- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे. ओबीसी समाजातून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. मात्र ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद निर्माण झाला आहे. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देईल, असं वारंवार सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, मराठा समाजाच्या पदरी आरक्षणावरून निराशा पडल्यामुळे मनोज जरांगे पाटील बीड येथील नारायण गडावरून दसऱ्याच्या दिवशी एक वाजेच्या सुमारास मराठा समाजाला कोणता आदेश देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
  7. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसऱ्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाची सुरक्षा, सामाजिक एकता आणि पर्यावरण अशा विविध मुद्द्यावर भूमिका मांडली. यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचे ९९ वे वर्ष आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.