शारजाह NZW vs SLW Live Streaming : न्यूझीलंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघ यांच्यात ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेतील 15वा सामना शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर आज 12 ऑक्टोबर (शनिवार) रोजी दुपारी खेळला जाईल.
A double header with major #T20WorldCup 2024 semi-final implications 👊
— ICC (@ICC) October 12, 2024
Day 10 preview ➡️ https://t.co/snRWQOzRM6 pic.twitter.com/O0P7UiBOQn
न्यूझीलंडसाठी अटीतटीचा सामना : सोफी डिव्हाईनच्या नेतृत्वाखालील न्यूझिलंड महिला संघ बाद फेरीसाठी पात्र होण्यासाठी या सामन्यात विजयाच्या शोधात असेल. मोसमातील सलामीच्या सामन्यात भारताचा पराभव केल्यानंतर त्यांना गतविजेत्या ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, श्रीलंकेला त्यांच्या निराशाजनक विश्वचषक मोहिमेचा शेवट विजयासह करायचा आहे. आशिया चषक विजेत्यांनी त्यांचे आतापर्यंतचे तिन्ही सामने गमावले आहेत, ज्यामुळं स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे.
दोन्ही संघांचं हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : श्रीलंकेविरुद्ध हेड टू हेड रेकॉर्डवर न्यूझीलंडचं वर्चस्व आहे. दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या 13 T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडनं 12 वेळा विजय मिळवला आहे, तर श्रीलंकेनं केवळ एकच सामना जिंकला आहे. या 13 सामन्यांपैकी पाच T20 विश्वचषक स्पर्धेत झाले, ज्यात न्यूझीलंडनं सर्व सामने जिंकले आहेत.
Let's do this! Watch LIVE in NZ on @skysportnz 📺 Live scoring at https://t.co/DibXOCLmmf & the NZC App📲 #T20WorldCup #CricketNation pic.twitter.com/aLNKmtXN4U
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) October 12, 2024
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कधी खेळला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना शनिवार, 12 ऑक्टोंबर रोजी होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना कुठं खेळवला जाईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह इथं होणार आहे.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला किती वाजता सुरु होईल?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 03:30 वाजता सुरु होईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टीव्हीवर कुठं पाहायचा?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येईल.
- ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग कुठं पहायचं?
ICC महिला T20 विश्वचषक 2024 चा न्यूझीलंड महिला विरुद्ध श्रीलंका महिला सामन्याचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही डिस्ने+हॉटस्टार ॲप आणि वेबसाइटवर पाहू शकाल.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन :
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ : सुझी बेट्स, जॉर्जिया प्लिमर, अमेलिया केर, सोफी डिव्हाईन (कर्णधार), ब्रुक हॅलिडे, मॅडी ग्रीन, इसाबेला गेज (यष्टिरक्षक), रोझमेरी मायर, फ्रॅन जोनास, ली ताहुहू, ईडन कार्सन.
श्रीलंका महिला क्रिकेट संघ : विशामी गुणरत्ने, चामरी अथापथु (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, नीलाक्षी डी सिल्वा, हसिनी परेरा, अनुष्का संजीवनी (यष्टिरक्षक), सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शिनी, उदेशिका प्रबोधिनी, इनोशी.
हेही वाचा :