ETV Bharat / state

Ujni Water Issue :उजनी पाण्याचा संघर्ष पुन्हा पेटला 11 आमदार व दोन खासदारांना पाठविला बांगडयाचा आहेर - उजनी पाण्याचा संघर्ष पुन्हा पेटला

उजनी पाणी (Ujni Water Issue) संघर्ष समितीच्या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार व 2 खासदारांना बांगड्याचा आहेर पाठवून (11 MLAs and two MPs sent to Bangdaya) निषेध केला आहे. सोलापूरच्या हक्काच पाणी पळविले जात असले तरी सोलापुरातील भाजपचे आमदार, खासदार व काँग्रेसचे आमदार मूग गिळून गप्प आहेत, असा सवाल करत उजनी संघर्ष समितीचे प्रमुख अतुल खूपसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला आहे.

Ujni Water Issue
उजनी पाण्याचा संघर्ष पुन्हा पेटला
author img

By

Published : Jan 3, 2023, 11:05 PM IST

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाच टीएमसी पाणी (Ujni Water Issue) हे इंदापूर तालुक्यातील 22 गावांना दिले जाणार असल्याने उजनी पाणी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. मोहोळ येथील शासकीय विश्रामगृह येथे सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांची बैठक संपन्न झाली. उजनी पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यातील 11 आमदार व 2 खासदारांना बांगड्याचा आहेर पाठवून (11 MLAs and two MPs sent to Bangdaya) निषेध केला आहे.

भाजपवर केली टीका : उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे यांनी बोलताना माहिती दिली की, महाविकास आघाडीची सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता भरणे लाकडी निंबोडी योजने अंतर्गत उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूर व बारामती कडे वळविण्यात येणार होता. सोलापूरच्या सर्व नेत्यांनी व शेतकरी संघटनांनी याचा तीव्र विरोध केला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ही लाकडी निंबोडी योजना रद्द झाली असल्याचे लेखी परिपत्रक काढले होते. आता पुन्हा एकदा लाकडी निंबोडी योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाविकास आघाडीचा अट्टाहास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) हे पूर्ण करत आहेत का?असा प्रश्न निर्माण केला जात आहे.

उपमुख्यमंत्र्यांचा दिला संदर्भ : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाविकास आघाडीची सरकार सत्तेत असताना असे म्हटले होते की, कितीही पाणी द्या, बारामतीकरांची व इंदापूरकरांची तहान भागणार नाही. आज देवेंद्र फडणवीस हे सत्तेत आहेत व जलसंपदा खाते त्यांच्याकडे आहे आणि आता पुन्हा एकदा लाकडी निंबोडी योजनेअंतर्गत उजनी धरणातील पाणी बारामती व इंदापूरला जात आहे. उजनी पाणी संघर्ष समितीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे शब्द आठवण करुन दिले आहे.

देवेंद्र फडणवीसांचा नवा डाव? : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा एक नवा डाव आहे, कारण बारामतीमधून भाजपचा खासदार व इंदापूर तालुक्यातुन भाजपचा आमदार निवडून आणायचा आहे. म्हणून लाकडी निंबोडी योजनेतुन सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूर व बारामतीकडे जाणार आहे. उजनी पाणी संघर्ष समितीच्या पदाधिकऱ्यांनी याला विरोध केला असून आज फक्त बांगड्यांचा आहेर पाठविला आहे, यावर तोडगा न निघाल्यास आम्ही शेतकरी हातात काठ्या घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.