पंढरपूर - चंद्रभागा नदीवरील शंभर वर्ष जुन्या पुलावरून निर्मनुष्य असणारा ट्रक चालकाला अंदाज न आल्यामुळे चंद्रभागा नदीत कोसळला. ट्रकमधील ऊस कामगार व मजूर विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
चालकाच्या चुकीमुळे ट्रक कोसळला
गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर व सोलापूर यांना जोडणारा जुना दगडी पुलावर बीड जिल्ह्यातून ऊस तोड कामगारांना घेऊन एक ट्रक आला. ट्रक तिथे लावून सर्व विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी निघून गेले. मात्र, ट्रक चालक असणाऱ्या व्यक्तीने मद्यपान केले होते. ट्रक बाजूला लावण्याचे बहाणा सुरू केला. मात्र चालकाला दगडी पुलाच्या कठड्याचा अंदाज न आल्यामुळे तो ट्रक चंद्रभागा नदीत कोसळला. त्यावेळी ट्रकमध्ये कोणी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. यात चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
चंद्रभागा नदीतील पूल वाहतुकीसाठी बंद
ट्रक कोसळल्यामुळे उसतोड कामगारांचे साहित्य चंद्रभागा नदीपात्रात पडले होते. पंढरपूर नगरपरिषदेकडून तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या. गेल्या अनेक दिवसापासून चंद्रभागा नदी पात्रातील दगडी पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, काही वाहने पार्किंग म्हणून दगडी पुलाचा वापर करताना दिसतात.