ETV Bharat / state

सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोलापुरातील थिएटर होणार पुन्हा सुरू

सोलापूरकरांचे सिनेमावेड प्रसिद्ध आहे. सिनेमा कोणताही असो येथील नागरिक तो थिएटरमध्ये जाऊनच पाहतात. कोरोनामुळे गेल्या सात महिन्यांपासून थिएटर बंद होते. आता शासन आणि प्रशासनाने मान्यता दिल्याने थिएटर पुन्हा सुरू होणार आहेत.

author img

By

Published : Nov 7, 2020, 6:18 PM IST

Theater
थिएटर

सोलापूर - कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील सिनेमागृहे, नाट्यगृहे यांना टाळे लावण्यात आले होते. शुक्रवारी (6 नोव्हेंबर) रात्री सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू करण्यासाठी परवानगी दिली. यामुळे 50 टक्के प्रेक्षकसंख्येसह सिनेमागृहे व नाट्यगृहे सुरू होणार आहेत.

सात महिन्यांनंतर सोलापूरमध्ये थिएटर सुरू होत आहेत

सोलापूर शहरात एकूण दहा चित्रपटगृहे व तीन नाट्यगृहे आहेत. इतिहासात पहिल्यांदाच या चित्रपटगृहांना व नाट्यगृहांना कोरोना महामारीमुळे टाळे लावण्यात आले होते. अनलॉक सुरू झाल्यानंतर बाजारपेठ, शासकीय कार्यलये, खासगी कार्यालये, आदींना परवानगी देण्यात येत आहे. आता राज्य शासनाने सिनेमागृहे व नाट्यगृहांनाही परवानगी दिली होती. मात्र, सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी खबरदारी म्हणून शहरातील सिनेमागृहे व नाट्यगृहांना परवानगी दिली नव्हती. काल पालिका आयुक्तांनी परवानगी दिली. या निर्णयामुळे थिएटरमध्ये काम करणारे कर्मचारी व मालकवर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाट्यक्षेत्रात काम करणारे कलाकार देखील या निर्णयामुळे खुश आहेत.

थिएटर मालकांनी सुरू केली तयारी -

आज शहरातील सिनेमागृहे आणि नाट्यगृहे स्वच्छ करण्यात आली. आशा थिएटर, चित्रमंदिर, प्रभात टॉकीज मालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावून घेतले आहे. शासनाने दिलेल्या नियमांत राहून व्यवसाय सुरू करण्यास थिएटर मालक सज्ज झाले आहेत. सिनेमागृहात सामाजिक अंतर राखण्यासाठी खुर्च्यांच्या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. दोन खुर्च्यांमधील एक खुर्ची रिकामी ठेवावी लागणार आहे.

इतिहासात पहिल्यांदाच थिएटर राहिली बंद -

सोलापुरातील चित्रपटगृहे ही पुणे मुंबईला देखील स्पर्धेत टक्कर देतात. येथील प्रेक्षक हौशी आहेत. नव्या चित्रपटाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून ते मनसोक्त आनंद घेतात. सोलापूर शहरातील चित्रमंदिर थिएटर व प्रभात टॉकीज ही सर्वात जुनी सिनेमागृहे आहेत. स्वातंत्र्यापूर्वी या सिनेमागृहांची स्थापना झाली असल्याची माहिती प्रभात टॉकीजचे मालक अण्णासाहेब पाटील यांनी दिली. स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच सात महिने बंद ठेवण्याची वेळ या कोरोना महामारीमुळे आल्याचेही त्यांनी सांगितले.

थिएटरमधील कर्मचाऱ्यांना मिळणार पुन्हा रोजगार -

कोरोनामुळे थिएटर बंद राहिली. थिएटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. काही थिएटरमालकांनी आपल्या कर्मचाऱ्यांना अर्धा पगार देत सावरण्याचा प्रयत्न केला. आता सात महिन्यांनंतर थिएटर पुन्हा सुरू होत असल्याने हे कर्मचारी आनंदात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.