ETV Bharat / state

सोलापुरात एप्रिल महिन्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; शासकीय आकड्यात तफावत असल्याचा संशय

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 1 हजार 905 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यामध्ये 1 हजार 333 पुरुष आणि 572 स्त्रिया आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : May 9, 2021, 10:42 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय आकडेवारी प्रमाणे एप्रिल महिन्यात 740 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. पण, याबाबत अनेकजण संशय व्यक्त करत आहेत. अंत्यसंस्कार करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या म्हणण्यानुसार एप्रिल महिन्यात सुमारे 1 हजार 200 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कारण, त्यांना प्रत्येक अंत्यविधीनंतर मानधन मिळतो. यावरून शासकीय आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे.

माहिती देताना ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते

आजपर्यंत सोलापूर शहरात 1 हजार 234 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

सोलापूर शहराचे कोरोना अहवाल सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाकडून दररोज दिले जाते. गेल्या वर्षी 12 एप्रिल, 2020 रोजी सोलापूर शहरात पहिला कोरोनाग्रस्त आढळला होता. त्याचा अहवालही त्याच्या मृत्यूनंतर प्राप्त झाला होता. तेव्हापासून अजतागायत 1 हजार 234 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 788 पुरुष आणि 446 स्त्रिया आहेत.

जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या शासकीय आकडेवारीनुसार सोलापूरच्या ग्रामीण भागात सर्वाधिक मृत्यू

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक फटका ग्रामीण भागाला बसत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिलेल्या महितीनुसार सोलापूर जिल्ह्यात आजपर्यंत 1 हजार 905 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यामध्ये 1 हजार 333 पुरुष आणि 572 स्त्रिया आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजतागायत 89 हजार 915 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. पण, ही आकडेवारी खरी आहे का कारण अनेक बाबी शासकीय अधिकारी खोटी माहिती देताना दिसून येत आहेत.

ग्रामीण भागात गांव तिथे उपचार सुरू

सोलापूर जिल्हा परिषदेमार्फत गाव तिथे उपचार किंवा कोविड सेंटर उभारले जात आहे. तसेच जिल्हा आरोग्य विभागकडून उपचार केले जात आहे. ग्रामीण भागातील लोकांमधील भीती नाहीशी करण्याबाबत जनजागृती केली जात आहे.

हेही वाचा - सोलापूर जिल्ह्यात संचारबंदीची कठोर अंमलबजावणी, जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा चालू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.