ETV Bharat / state

...म्हणून संतापलेल्या नगरसेवकांनी पळवली महापालिका आयुक्तांची खुर्ची

महापालिकेची सर्वसाधारण सभा वारंवार तहकूब होत असल्याने महापालिकेच्या विरोधी पक्षातील नगरसेवक संतापले. आयुक्त वेळेवर न आल्याने त्यांनी आयुक्तांची खूर्ची उचलून महापौराच्या दालनात नेली. त्याठिकाणी महापौरांवर प्रश्नांचा भडीमार करत ठिय्या मांडला.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 14, 2020, 3:43 PM IST

Updated : Sep 14, 2020, 5:17 PM IST

सोलापूर - महानगरपालिकेत नगरसेवकांनी महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांची खुर्ची घेऊन गेल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. 14 सप्टें.) घडली. वारंवार सभा तहकूब झाल्याने व महापालिका आयुक्त वेळेवर सभेला हजर न झाल्याने सर्व पक्षीय नगरसेवक चिडले होते. विकासासाठी त्यांनी घोषणाबाजी करत आयुक्तांची खूर्ची महापौर दालनात आणून ठेवली व ठिय्या केला.

आयुक्तांची खूर्ची उचलून महापौरांच्या दालनात नेताना नगरसेवक

वारंवार सभा तहकूब केल्याने संतापलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी थेट खुर्चीच पळवून नेत महापौरांच्या दालनात नेऊन ठेवली. संतापलेल्या कॉंग्रेस, वंचित आघाडी आणि एमआयएमच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची खुर्चीच पळवल्याने खळबळ उडाली होती.

महत्वाच्या विषयांवर चर्चा होणे अपेक्षित असतानाही जाणीवपूर्वक सत्ताधारी आणि महापालिका आयुक्त सभा तहकूब करत असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे त्यांना श्रध्दांजली वाहून ही सभा तहकूब केली असल्याचे स्पष्टीकरण महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील प्रत्येक नागरिक मेटाकुटीला आला आहे. अर्थव्यवस्थेचे पूर्ण कंबरडे मोडले आहे. सोलापूर शहरात देखील विकास कामाचे काम थांबले आहे. अशा संकटाच्या काळात सोलापूर महानगरपालिकेने वेळीच योग्य ते निर्णय घेत आणि कोरोनाचा धोका कसा टाळता येईल यासाठी एकत्र येत काम करणे सामान्य नागरिकांना अपेक्षित आहे. पण, निवडून दिलेले नेतेच गोंधळ घालत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त वेळेवर न आल्याचे कारण पुढे करत वंचितचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, एमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख, रियाझ खरादी, काँग्रेसचे नगरसेवक विनोद भोसले, मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्री, अ‌ॅड यु.एन. बेरिया आदी नगरसेवक यावेळी महापौर दालनात उपस्थित होते. संतापलेल्या नगरसेवकांनी महापौरांसमोर प्रश्नांचा भडिमार करत ठिय्या आंदोलन केले.

हेही वाचा - क्वारंटाईन रुग्णाचे चोरट्यांनी फोडले घर; बारा तोळे सोन्यासह दीड किलो चांदी लंपास

Last Updated : Sep 14, 2020, 5:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.