सोलापूर - शिवसेना उपनेते सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक डॉ. तानाजी सावंत यांच्या रूपाने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच शिवसेनेला कॅबिनेट मंत्री पद मिळाले आहे. सावंत हे यवतमाळमधून विधान परिषदेचे सदस्य आहेत.
जिल्ह्यात आधीच्या युती सरकारमध्ये प्रकाश खंदारे यांना राज्यमंत्री म्हणून शिवसेना-भाजप युतीच्या काळात संधी मिळाली होती. तसेच 11 अपक्षांचा पाठिंबा दिल्यामुळे आमदार दिलीप सोपल हेही एकेकाळी सेनेमार्फत मंत्री पदावर होते. मात्र, आता सोलापूर जिल्ह्याला प्रथमच शिवसेनेच्या संपर्कप्रमुखाला कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे सर्वत्र जल्लोष केला जात आहे.