सोलापूर - अवैध धंदे तसेच सट्टेबाजी करणारा कोणीही असो, त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आहे, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. ग्राम पंचायत निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी देसाई हे बुधवारी (23 डिसें.) सोलापूरच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी ते बोलत होते.
नोव्हेंबर महिन्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेने आयपीएलवर सट्टा लावणाऱ्यांवर कारवाई केली होती. याच्या तपासात कर्नाटकातील कलबुर्गी (पूर्वीचे गुलबर्गा) येथून एक चारचाकी वाहन (के ए 51 एम पी 9955) पोलिसांनी जप्त केले होते. त्या वाहनाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल होणार का, असा प्रश्न केल्यास गृहराज्यमंत्र्यांनी उत्तर दिले.
कर्नाटकातील मोठे राजकीय मासे गळाला लागण्याची शक्यता
सट्टेबाजीच्या या गुन्ह्यात जप्त चारचाकी कर्नाटकातील राजकीय नेत्याची असल्याची चर्चा असून जर अधिक तपास केल्यास कर्नाटकातील मोठे राजकीय मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.
कारवाईवेळी कोणत्याही राजकीय दबावाला थारा नाही
सट्टेबाजांवरील पोलीस तपासात कोणत्याही राजकीय दबावाला थारा दिली जाणार नाही. तसेच कठोर कारवाई केली जाणार आहे, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - सोलापूर शहर नव्हे खड्डापूर शहर; संभाजी ब्रिगेडने लावला खड्ड्यात फलक
हेही वाचा - एल्गार परिषदेचा निर्णय राज्य सरकार घेईल - गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई