ETV Bharat / state

Ashadhi Wari 2021 विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आरास तयार करण्यासाठी 50 हजार फुलांचा वापर करण्यात आले. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त भारत शेठ भुजबळ यांनी भक्त सेवेतून केली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

author img

By

Published : Jul 20, 2021, 4:40 AM IST

Updated : Jul 20, 2021, 5:11 AM IST

पंढरपूर - मंगळवारी आषाढ देवशयनी एकादशी साजरी केली जात आहे. या निमित्ताने पंढरपूरमधील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर गुलाब, ऑर्किड्स, एनथोरीयम, जरबेरा फुलांनी सजविण्यात आले आहे. गाभाऱ्यात फुलांची आरास केल्याने विठ्ठलाच्या या रुपाला पाहून मन अगदी प्रसन्न झाल्याचे वातावरण मंदिरात तयार झाले.

विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आरास तयार करण्यासाठी 50 हजार फुलांचा वापर करण्यात आले. ही आरास पुणे येथील विठ्ठल भक्त भारत शेठ भुजबळ यांनी भक्त सेवेतून केली. कोरोना संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन मंदिरात जाऊन भाविकांना घेता येत नसले तरी विविध माध्यमातून आपणही देवाचे मनमोहक रूप घर बसल्या पाहू शकतो. विठ्ठल मंदिराचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप व नामदेव पायरी भागामध्ये फुलांची आरास करण्यात आली.

विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य फुलांची आरास

हेही वाचा-11th CET exam 21 ऑगस्टला होणार; आजपासून नोंदणी सुरू

मंदिरात मंगलमय वातावरण-

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून आषाढी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात व मंदिरात फुलांची रंगसंगती करून मनमोहक अशी फुलांची आरास तयार करण्यात आली आहे. मंदिरात मोगरा, झेंडू, गुलाब, ऑर्किड अशा 20 ते 25 अशा विविध फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आली आहे. मंदिरात रंगबेरंगी जरबेरा फुलांची सजावट केली असल्याने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

नयनरम्य फुलांची आरास
नयनरम्य फुलांची आरास

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा संपन्न; वर्ध्यातील कोलते दाम्पत्य ठरले मानकरी

Last Updated : Jul 20, 2021, 5:11 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.