सोलापूर- पंढरपूरवरून मुंबईला जाणारी फास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे. तसेच विजापूर-मुंबई ही फास्ट पॅंसेजर गाडीही रद्द करण्यात आली आहे. मुंबई विभागात होत असलेल्या तांत्रिक कामामुळे या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्या आगोदरच रद्द करण्यात आल्या होत्या. आता त्या पुन्हा ३० तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेमधील मुंबई विभागातील मंकी हिल-कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामामुळे गाड्या रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आले आहेत. रेल्वेच्या मुंबई विभागातील मंकी हिल-कर्जत स्थानकादरम्यान ‘अप लाइन’ वर तांत्रिक कामामुळे १ जानेवारी ते २० जानेवारी पर्यत गाड्या रद्द आणि मार्ग परिवर्तन करण्यात आले होते. त्या गाड्या आता दिनांक २१ जानेवारी ते ३० जानेवारी २०२० पर्यंत रद्द करण्यात आले असून त्यांचे मार्ग परिवर्तन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदर कालावधीत रद्द/आंशिक रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढील प्रमाणे:
१) गाडी. क्र. ५१०२७ मुंबई-पंढरपूर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
२) गाडी. क्र. ५१०२८ पंढरपूर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
३) गाडी. क्र. ५१०२९ मुंबई-विजापूर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
४) गाडी. क्र. ५१०३० विजापूर- मुंबई फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
५) गाडी. क्र. ५१०३३ दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
६) गाडी. क्र. ५१०३४ दौंड- साईनगर फास्ट पॅसेजर रद्द करण्यात आली आहे.
७) गाडी. क्र. ११०२५/११०२६ भुसावळ-पुणे-भुसावळ एक्सप्रेस मनमाड मार्गे हिला दौड मार्गे परिवर्तन करण्यात आली आहे.
सर्व संबंधित रेल्वे प्रवाशांनी गाड्यांमध्ये परिवर्तन झाल्याची नोंद घ्यावी व आपला प्रवास सुनिश्चित करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा -'संविधानामुळेच मला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा बहुमान'