ETV Bharat / state

आषाढीच्या पूर्वसंध्येला सकल मराठा समाज करणार मुख्यमंत्र्यांचा सत्कार - cm

मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना याच प्रश्नावरून विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्यात आले होते. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीवारीत त्यांचा जंगी सत्कार करणार असल्याची माहीती पंढरपूर सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

मराठा समाज करणार मुख्यमंत्र्यांचा सत्कार
author img

By

Published : Jul 6, 2019, 1:24 PM IST

सोलापूर- मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकल मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपुरात हा सत्कार समारंभ पार पडणार आहे, अशी माहिती पंढरपूर सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषद

मागील दोन वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे आंदोलने करण्यात आले. आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक झालेला मराठा समाज आता आरक्षण मिळाल्यानंतर शांत झाला आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना याच प्रश्नावरून विठ्ठलाच्या शासकीय महापूजेपासून रोखण्यात आले होते. त्यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीवारीत त्यांचा जंगी सत्कार करणार असल्याची माहिती पंढरपूर सकल मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयात २७ जुनला मराठा आरक्षणाबाबत सुनावणी झाली. निर्णयात न्यायालयाने मराठा समाजाला नोकरीमध्ये १३ तर शिक्षणासाठी १२ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाच्या या निर्णयाचे व सरकारच्या भूमिकेचे मराठा समाजाने स्वागत केले. मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान ४२ तरुणांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही व दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला यासाठी मुख्यमंत्र्यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा आंदोलना दरम्यान बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी देण्याचे आश्वासनही देणय्यात आले आहे. अद्याप सरकारकडून आश्वासनपूर्ती झाली नाही. तसेच मराठा तरुणांवर दाखल झालेले खटले मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, अर्जून चव्हाण, दीपक वाडदेकर, संतोष कवडे, जयवंत माने, किरण घाडगे, शेखर भोसले, दत्ता पाटील, मोहन अनपट आदी उपस्थित होते.

Intro:mh_sol_02_maratha_cm_satkar_7201168
सकल मराठा समाज करणार आषाढीच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्र्यांचा सत्कार

सोलापूर-
मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मराठा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. आषाढी एकादशी च्या पूर्व संध्येला पंढरपूरात भव्य दिव्य असा सत्कार करण्यात येणार आहे. Body:गेल्या दोन वर्षा पासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या साठी राज्यभर लाखोंच्या संख्येने मोर्चे आंदोलन करण्यात आले तसेच आरक्षणाच्या प्रश्नावरून आक्रमक झालेला मराठा समाज आता आरक्षण मिळाल्या नंतर शांत झाला आहे.

गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना याच प्रश्नावरून विठ्ठलाच्या शासकीय महापूजे पासून रोखणार्या याच सकल मराठा समाजाच्या वतीने आषाढीवारीत त्यांचा जंगी सत्कार करणार असल्याचे पंढरपूर सकल मराठा समाजातील पदाधिकार्यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.

27 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली यामध्ये न्यायालयाने नोकरीमध्ये 13 तर शिक्षणासाठी 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय दिला.
न्यायालयाच्या या निर्णयाचे व सरकारच्या भूमिकेचे सर्वत्र स्वागत केले.

मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान 42 तरुणांनी बलिदान दिले त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले नाही व दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला यासाठी मुख्यमंत्री यांचे जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेण्यात आला

त्याच बरोबर आंदोलना दरम्यान बळिदान दिलेल्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी मध्ये सहभागी करून घेण्याचे आश्वासनही दिले होते तसेच अद्यापही सरकार कडून आश्वासनपूर्ती झाली नाही तसेच मराठा तरुणांवरील झालेल्या केसेस मागे घेऊन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे
पत्रकार परिषदेत माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले,अर्जून चव्हाण, दीपक वाडदेकर,संतोष कवडे, जयवंत माने,किरण घाडगे,शेखर भोसले,दत्ता पाटील,मोहन अनपट आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.