ETV Bharat / state

आरोग्यविषयक माहिती लपवणांऱ्यावर पोलीस कारवाई करा; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रशासनाला सूचना

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व्हेक्षणातून कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांच्या तत्काळ चाचण्या करा. चाचण्यांची संख्या वाढवा. सर्व्हेक्षणात माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज भासल्यास पोलीस कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या.

आरोग्यविषयक माहिती लपवणांऱ्यावर पोलीस कारवाई करा; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रशासनाला सूचना
आरोग्यविषयक माहिती लपवणांऱ्यावर पोलीस कारवाई करा; पालकमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रशासनाला सूचना
author img

By

Published : Apr 26, 2020, 9:31 PM IST

सोलापूर - सर्व्हेक्षणामध्ये आरोग्यविषयक चुकीची माहिती देणाऱ्यावर पोलीस कारवाई करण्याच्या सूचना सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या आहेत. पालकमंत्र्यांनी आज कोरोनासंदर्भात आढावा बैठक घेतली. शहरातील सर्व्हेक्षण लवकरात लवकर पूर्ण करावे आणि आजाराविषयी माहिती न देणाऱ्यावर वेळप्रसंगी पोलीस कारावाईच्या सूचनाही दिलेल्या आहेत.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री भरणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ आदी उपस्थित होते.

सोलापुरातील कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेच्या सर्व्हेक्षणातून कोरोनाची लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांच्या तत्काळ चाचण्या करा. चाचण्यांची संख्या वाढवा. सर्व्हेक्षणात माहिती न देणाऱ्या किंवा माहिती लपवणाऱ्या नागरिकांवर गरज भासल्यास पोलीस कारवाई करा, अशा सूचना त्यांनी केल्या. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी उपाययोजना करीत असतानाच त्यांना अत्यावश्यक सेवा घरपोच मिळतील, यासाठी महापालिकेने नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. कोरोना बाधितांबरोबरच इतर रोगाने आजारी असणाऱ्यांवर उपचार करण्यात यावेत. त्यामध्ये अडथळा येणार नाही, याची दक्षता घ्या. खासगी दवाखाने सुरू राहतील. यासाठी वैद्यकीय संघटनांची मदत घ्या, अशा सूचना त्यांनी केल्या.

डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, कोरोना विषाणूच्या विरूद्ध काम करीत असणारे विविध विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी यांची काळजी घ्यायला हवी. सर्व्हेक्षण करणारी कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांना पीपीई कीट, मास्क, फेस शिल्ड पुरवा असे त्यांनी सांगितले. सोलापूर शहरात सुरू असणारे सर्व्हेक्षण वेळेत आणि काटेकोरपणे पूर्ण केले जावे. या सर्व्हेक्षणात ताप, सर्दी आणि कोरडा खोकला असणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी यंत्रणा विकसित करा, अशा सूचना पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

जिल्ह्यात विविध ठिकाणी असणाऱ्या निवारा शिबिरात स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यात याव्यात. त्यांची वैद्यकीय तपासणी केली जावी, असेही त्यांनी सांगितले. केशरी कार्डधारकांना धान्य वाटप सुरू करा. त्याचबरोबर अंत्योदय आणि कुटुंब प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थ्यांना धान्यांचे आणि मोफत तांदळाचे वितरण करा, असे त्यांनी सांगितले. मात्र, धान्य वितरण करताना दुकानांत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रात घरपोच धान्य पोहचवता येतील का, याबाबत प्रयत्न करा, असेही पालकमंत्री यांनी यावेळी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.