ETV Bharat / state

उजनी धरणातील सोलापूरच्या हक्काचं पाणी पळवलं असेल तर राजकीय संन्यास घेईन - पालकमंत्री - पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापूर उजनी पाणी वाद

इंदापूर तालुक्याला 5 टीएमसी पाणी दिल्याच्या कारणावरून सोलापुरातील राजकारण पेटले आहे. पालकमंत्र्यांवर विविध स्तरावरून टीका होत आहे. त्यावर प्रतिउत्तर देताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जर मी सोलापूरकरांच्या हक्काचं पाणी माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो असेल तर मी मंत्रीपद, आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन.

सोलापूर
सोलापूर
author img

By

Published : Apr 25, 2021, 7:14 PM IST

सोलापूर - उजनी धरणामधून इंदापूर तालुक्याला 5 टीएमसी पाणी दिल्याच्या कारणावरून सोलापुरातील राजकारण पेटले आहे. पालकमंत्र्यांवर विविध स्तरावरून टीका होत आहे. त्यावर प्रतिउत्तर देताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, जर मी सोलापूरकरांच्या हक्काचं पाणी माझ्या मतदारसंघात घेऊन गेलो असेल तर मी मंत्रीपद, आमदारकीचा राजीनामा देऊन राजकीय संन्यास घेईन. सोलापूरकरांच्या हक्काचं पाणी घेऊन गेलोच नाही, असे त्यांनी तांत्रिक कारणे देत सांगत त्यांनी विरोधकांना टीका केली.

सोलापूर

आज रविवारी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना महामारीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. आधी कोरोना महामारीशी लढू आणि मग उजनीच्या पाण्यावरून राजकारण करू, असेही त्यांनी सांगितले.

उजनी धरणातून इंदापूर (पुणे जिल्हा) तालुक्यासाठी पाणी फिरवले -

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याची परवानगी राज्यशासनाने दिली आहे. इंदापूर तालुक्याचे आमदार व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना शेतीसाठी पाण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांकडे केली होती. ही मागणी मान्य करून राज्य शासनाने उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्याची परवानगी दिली आहे. मात्र, हे पाणी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी राखीव असताना दत्ता भरणे यांनी आपल्या मतदारसंघासाठी पाणी पळविले असा आरोप करत विरोधकांनी एकच हल्ला केला आहे.

तर राजकीय संन्यास घेईन - पालकमंत्री

मी कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता इंदापूर तालुक्यासाठी पाणी घेतले आहे. तसेच सोलापूरच्या हक्काचे पाणी मी एक थेंब देखील घेतले नाही. विरोधकांनी मी सोलापूरच्या हक्काचे पाणी घेतले असेल, हे सिद्ध केल्यास मी मंत्रीपदाचा, आमदारकीचा राजीनामा देईन, असे पालकमंत्र्यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. मी राजकीय संन्यास घेईन, सिद्ध करा असेही त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.