सोलापूर Solapur Accident : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावाजवळ भीषण अपघात झालाय. सिमेंटचा बलकर उलटून झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12 च्या सुमारास घडली. मृतांमध्ये इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलीचा समावेश आहे.
मृतामध्ये शाळकरी मुलीचा समावेश : दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिमेंट कारखान्यातून सोलापूरकडं निघालेली सिमेंट बलकर औज (अ) येथील जिल्हा परिषद शाळेसमोर उलटला. या गावातील दोघांचा मृत्यू झाला. या अपघातात शाळकरी मुलांसह एक वृद्ध व्यक्ती सिमेंटच्या बल्करखाली दबले होते. पोलिसांनी बलकर चालकाला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
चार जणांचा मृत्यूनं सोलापूर जिल्हा हादरला : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील मोठा फौजफाटा या ठिकाणी आला होता. पलटी झालेल्या बलकरला क्रेनच्या साहाय्यानं बाजूला करण्यात आलं आहे. अपघातात चेंगरून प्रज्ञा बसवराज दोडतले (इयत्ता 3 री,रा औज), विठ्ठल शिंगाडे (वय 70 वर्ष,रा औज ता. दक्षिण सोलापूर), महेश इंगळे यांचा मृत्यू झाला आहे. आणखी एकाची ओळख पटली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, वळसंग पोलीस ठाण्याचे एपीआय सनगले, अतुल भोसले, आरटीओ अधिकारी गवारे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.
पोलीस अधिकाऱ्यांसोबत गावकऱ्यांचा वाद : घटनेनंतर औज येथील ग्रामस्थांनी गोंधळ सुरू केला. औज गावाच्या पूढे चेट्टीनाड, झुआरी सिमेंटच्या फॅक्टऱ्या आहेत. त्यामुळं सिमेंटची वाहतूक इथं मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळं गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे वाहतूक बंद करण्यासाठी तक्रार केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडं दुर्लक्ष केल्यानं पुन्हा किती जणांचा बळी घेणार असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा -
- Murder in Union Ministers House : केंद्रीय मंत्र्यांच्या घरात एकाची हत्या, मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप
- 19 Bangladesh People Arrested : बुधवार पेठेत अवैध राहणाऱ्या १९ बांगलादेशींच्या आवळल्या मुसक्या
- BJP Women Officer Murder : भाजपा महिला पदाधिकाऱ्याच्या हत्ये प्रकरणी माहिती देणाऱ्याला नागपूर पोलीस देणार एक लाखांचे बक्षीस