ETV Bharat / state

जात पडताळणी समितीने दिला दबावाखाली निकाल, खासदार महास्वामींच्या वकिलाचा आरोप - सोलापूर जिल्हा बातमी

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवत असताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर केला होता. मात्र, विद्यमान खासदार यांनी सादर केलेला बेडा जंगम जातीचा बनावट असल्यामुळे तो अवैध ठरवण्यात आला आहे.

Solapur
सोलापूर
author img

By

Published : Feb 25, 2020, 9:19 PM IST

सोलापूर - लोकसभेचे विद्यमान खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा जातीचा दाखला अवैध ठरवण्यात आला आहे. त्यावर जात पडताळणी समितीने दबावाखाली असा निकाल दिला असल्याचा आरोप महास्वामी यांचे वकील संतोष नावकर यांनी केला आहे. तर खासदार महास्वामी यांनी बोगस दाखला दिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तत्काळ फेरनिवडणूक घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तक्रारदारांनी म्हटले आहे.

दबावाखाली निकाल दिल्याचा खासदार महास्वामींच्या वकिलाचा आरोप

सोलापुरातील खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी सोलापूर 2019 लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात निवडणूक लढवत असताना जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी बेडा जंगम या जातीचा दाखला सादर केला होता. मात्र, विद्यमान खासदार यांनी सादर केलेला बेडा जंगम जातीचा दाखला हा बनावट आहे. खासदार हे लिंगायत असल्यामुळे त्यांनी सादर केलेला दाखला तत्काळ रद्द करावा, अशी तक्रार लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूरातून उमेदवार असलेले प्रमोद गायकवाड आणि मिलिंद मुळे यांनी केली होती.

या प्रकरणावर निकाल देताना जात पडताळणी समितीने विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांचा बेडा जंगम जातीचा दाखला अवैध ठरवला आहे. जात पडताळणी समितीने हा निर्णय घेत असताना तक्रारदार यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला असल्याचा आरोप वकील संतोष नावकर यांनी केला आहे. जात पडताळणी समितीने सुरुवातीपासूनच एकतर्फे भूमिका घेत हा निर्णय दिला आहे. निर्णय देत असताना देखील अनेक गोष्टींचा तसेच वकिलांनी दिलेल्या अर्जाचा कोणताही विचार न करता हा दाखला रद्द केला आहे. त्यामुळे समितीही ही दबावाखाली काम करत असल्यामुळे आम्ही या समितीसमोर म्हणणे सादर करणार असल्याची भूमिका विकलांनी घेतली आहे.

दरम्यान, विद्यमान खासदार यांचा जातीचा दाखला अवैध ठरल्यामुळे बोगस कागदपत्र तयार करणाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करावेत. तसेच सोलापूर लोकसभेसाठी पोटनिवडणूक घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे तक्रारदार प्रमोद गायकवाड आणि मिलिंद मुळे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.