ETV Bharat / state

राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार

पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन बैठकीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, की कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे हे केंद्र सरकारला समजायला हवे. आम्हाला तर या लॉकडाऊनमध्ये व कोरोना महामारीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढणे महत्वाचे वाटते. अशा शब्दांमध्ये पवारांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.

Sharad Pawar slams Central government over Ram Mandir in Solapur
राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार
author img

By

Published : Jul 19, 2020, 7:56 PM IST

सोलापूर : राम मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, तर त्यासाठी ठोस उपाययोजना कराव्या लागणार आहेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार आणि केंद्र सरकारनेही सध्या कोरोनाच्या संकटाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

पवार हे रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी जिल्हा नियोजन बैठकीचा आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे, आमदार प्रणिती शिंदे, उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे आदी नेत्यांसह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,जिल्हा परिषद सीईओ प्रकाश वायचळ, मनपा आयुक्त पी. शिवशंकर हे उपस्थित होते.

राम मंदिर बांधून कोरोना महामारी जाणार नाही; त्यासाठी उपाययोजना महत्वाच्या : शरद पवार

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले, की कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे हे केंद्र सरकारला समजायला हवे. सध्या राममंदिर निर्मिती समितीची बैठक सुरू आहे. देशातील परिस्थिती पाहता सध्या कोरोना महामारी रोखणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने या महामारीशी दोन हात करून, बुडत चाललेल्या अर्थव्यवस्थेला चालना देणे गरजेचे आहे. आम्हाला तर या लॉकडाऊनमध्ये व कोरोना महामारीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढणे महत्वाचे वाटते. अशा शब्दांमध्ये पवारांनी केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे.

हेही वाचा : फडणवीसांना साखर उद्योगाची जाणीव झाली याचे समाधान, हसन मुश्रीफांचा टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.