ETV Bharat / state

भूक न लागणे, थकवा येणे, डोळे लाल होणे कोरोनाची नवी लक्षणे -डॉ. संजीव ठाकूर - सोलापूर कोरोना बातम्या

सध्या पसरलेल्या दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूमुळे कमीत कमी दहा जणांना याची लागण होत असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे. आज दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

second wave of corona is terrible said Sanjeev Thakur in solapur
'कोरोनाची दुसरी लाट भयानक; भूक न लागणे, थकवा येणे ही नव्या कोरोनाची लक्षणे'
author img

By

Published : Apr 17, 2021, 6:17 PM IST

Updated : Apr 17, 2021, 7:12 PM IST

सोलापूर - कोरोनाची आलेली दुसरी लाट ही अतिशय भयंकर आहे. याची लक्षणेदेखील अतिशय घातक आहेत. नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्यास भूक न लागणे, थकवा येणे, डोळे लाल होणे, पोटदुखी, जुलाब असे लक्षणे आहेत. पूर्वीचा कोरोना लाटेत संपर्कात आलेल्या दोन ते चार जणांना लागण होत होती. परंतु सध्या पसरलेल्या दुसऱ्या लाटेतील कोरोना विषाणूमुळे कमीत कमी दहा जणांना याची लागण होत असल्याची माहिती मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी दिली आहे. आज दुपारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

प्रतिक्रिया

रेमडेसिवीरमुळे लिव्हर आणि किडनीवर परिणाम -

एखाद्या रुग्णाला कोरोना विषाणूची लागण झाली असल्यास ताबडतोब त्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे हे चुकीचे आहे. कारण रुग्ण जेव्हा माईल्डमधून मॉडरेट या स्टेपमध्ये ज्यावेळी जात असतो, त्यावेळी कोरोना विषाणूची संख्या वाढत असते. त्यावेळी विषाणूची वाढती संख्या रोखण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केला जातो. पण एखाद्याला कोरोनाची लागण झाली आहे आणि तो पाहिल्या स्टेपमध्ये आहे, त्यावेळी व्हिटॅमिन सी, मल्टीव्हिटॅमिन्स गोळ्या पाहून रुग्ण बरा होऊ शकतो, असे डॉ. ठाकूर यांनी सांगितले. रेमडेसिवीर इंजेक्शन दिल्याने पुढे त्या रुग्णांची लिव्हर चाचणी आणि किडनीची चाचणी करावी लागणार आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी दोन मास्क वापरा -

कोरोनाची दुसरी लाट पसरली आहे. लसीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. दुसऱ्या लसीकरणानंतर 15 दिवसांनी संबंधित व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. पण त्याला कोरोनाची लागण होणार नाही, असे अजिबात नसून लसीकरण झालेल्या व्यक्तीलादेखील कोरोनाची लागण होत आहे. या नव्या कोरोनापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी दोन मास्क वापर करावे, असे देखील डॉ ठाकूर म्हणाले.

हेही वाचा - कच्चा माल द्या, सीरमच्या पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना साकडे

Last Updated : Apr 17, 2021, 7:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.