सोलापूर - दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज सांगता झाली. तत्पूर्वी सोलापूरात पार्क मैदानावर पार पडलेल्या सभेत भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धयेश्वर शिवाचार्य यांनी काव्यमय भाषण करत उपस्थितांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले.
डॉ. जयसिद्धयेश्वर शिवाचार्य यांनी अटलबिहारी वाजपेयी यांची कविता सादर केली. त्याला उपस्थितांनी दाद दिली. यावेळी त्यांनी 'फिर एक बार मोदी सरकार'चा नारा दिला. शेतकरी कुटुंबातुन आलो असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न माहित असल्याचे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यास मी पात्र आहे, असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला.