ETV Bharat / state

Suicide: सोलापूरात शालेय विद्यार्थीनीने घेतला गळफास, आत्महत्येचे कारण गुलदस्त्यातचं - वैष्णवी वसंत कोकरे

सोलापूर शहरातील नववीत शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी वसंत कोकरे, वय १४, रा. भारतमाता नगर, शेळगी असे आत्महत्या (schoolgirl hanged herself) केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे.

Suicide
सोलापूरात शालेय विद्यार्थीनीने घेतला गळफास
author img

By

Published : Nov 20, 2022, 11:05 PM IST

Updated : Nov 21, 2022, 9:12 AM IST

सोलापूर: सोलापूर शहरातील नववीत शिक्षण घेत असलेल्या शालेय विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी वसंत कोकरे वय १४, रा. भारतमाता नगर, शेळगी असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. आईला अभ्यास करते असे सांगून तिने दार लावले होता. बराच वेळ झाला तरी तिने दार उघडले नव्हते. शेवटी आईने तिला हाक दिली, प्रतिसाद मिळत नसल्याने तिने खिडकीतून डोकाऊन पाहिले. वैष्णवीने नायलॉनच्या दोरीने छताच्या फॅनला गळफास घेतला होता.

आत्महत्येचं कारण गुलदस्त्यातचं हे दृश्य पाहून आईने हंबरडा फोडला.आजूबाजूच्या शेजाऱ्यांनी ताबडतोब याबाबत पोलिसांना माहिती दिली आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मृत झाल्याची माहिती दिली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेच्यावेळी आई ही घरातच होती. स्वयंपाक करून आईने मुलीस जेवयास सांगितले होते.वैष्णवीने अभ्यास करायचे आहे ,असे सांगितले आणि दार लावून घेतले.

शालेय विद्यार्थीनीने राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती कळताच एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक राजन माने, हेड कॉन्सटेबल डी. जी. नवले हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नातेवाईकांच्या मदतीने छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.आत्महत्या का केली?,त्याला अभ्यासचा तणाव होता का?घरात कोणी रागावले होते का?या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

Last Updated : Nov 21, 2022, 9:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.