ETV Bharat / state

भिडेंनी तोडले अकलेचे तारे.. म्हणे एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी - चांद्रयान २

एकादशीला ब्रम्हांडातील स्थिती संतुलित असते म्हणून अमेरिकेने एकादशीला यान सोडले असे म्हणत भिडे यांनी वादाला तोंड फोडले आहे. या भिडे यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून जनसमान्यांतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

संभाजी भिडे गुरुजी
author img

By

Published : Sep 9, 2019, 7:57 PM IST

सोलापूर - नेहमी आपल्या अनपेक्षित वक्तव्यामुळं चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांनी आता आणखी एक नवा गौप्यस्फोट केला आहे. अमेरिकेने एकादशीला यान सोडले म्हणून ते यशस्वी झाले, असे वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी केले आहे. भारताच्या चांद्रयान २ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आपले मत मांडताना संभाजी भिडे यांनी हा अफलातून दावा केला आहे. यामुळे सोशल मीडियावर गुरुजी चर्चेचा विषय बनले आहेत.

एकादशीला अवकाशात यान सोडल्याने अमेरिका झाली यशस्वी - संभाजी भिडे

हेही वाचा - 'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो

या वक्तव्यामुळे भिडे गुरुजी यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडले आहे. गुरुजींच्या म्हणण्यानुसार, एकादशीलाच त्यांनी यान सोडले म्हणून ते यशस्वी झाले. भिडे गुरुजींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

हेही वाचा - काँग्रेससोबत आघाडी नाही; वंचित स्वतंत्र लढणार, प्रकाश आंबेडकरांचा निर्णय

अमेरिकेने यापूर्वी 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले नाही. मग नासाच्या एका शास्त्रज्ञाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला. त्यानंतर एकादशीला 39 वा उपग्रह सोडला तेव्हाच त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचं संभाजी भिडे गुरुजी यांचे म्हणणे आहे.

एकादशीला ब्रम्हांडातील स्थिती संतुलित असते म्हणून अमेरिकेने एकादशीला यान सोडले, असे म्हणत भिडे यांनी वादाला तोंड फोडले आहे. भिडे यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून जनसमान्यांतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

Intro:सोलापूर : नेहमी आपल्या अनपेक्षित वक्तव्यामुळं चर्चेत राहणाऱ्या संभाजी भिडे गुरुजी यांनी आता आणखी एक नवा गौप्यस्फोट केलाय.अमेरिकेनं एकादशीला यान सोडलं म्हणून ते यशस्वी झाले असं वादग्रस्त विधान शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांनी केलंय.भारताच्या चांद्रयान २ मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आपलं मत मांडताना संभाजी भिडे यांनी हा अफलातून दावा केलाय...तोही अमेरिकेच्या हवाल्याने केल्याने सोशल मीडियावर गुरुजी चर्चेचा विषय बनले आहेत.Body: या वक्तव्यामुळं भिडे गुरुजी यांनी पुन्हा नव्या वादाला तोंड फोडलंय.गुरुजींच्या म्हणण्यानुसार अमेरिका भारतीय कालगणना मानते.त्यानुसारच त्यांनी यान सोडलं म्हणून ते यशस्वी झाले..भिडे गुरुजींच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतप्त आणि समर्थनीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अमेरिकेनं यापूर्वी 38 वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला.त्यात त्यांना यश आलं नाही. मग नासाच्या एका शास्त्रज्ञाने भारतीय कालमापन पध्दतीचा अभ्यास केला.त्यानंतर एकादशीला 39 वा उपग्रह सोडला तेव्हाच त्यांचा प्रयोग यशस्वी झाल्याचं संभाजी भिडे गुरुजी यांचं म्हणणं आहे.

Conclusion:एकादशीला ब्रम्हांडातील स्थिती संतुलित असते म्हणून अमेरिकेनं एकादशीला यान सोडलं.या भिडे यांच्या वक्तव्याची राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झाली असून जनसमान्यांतून तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.