ETV Bharat / state

चार खासदारांच्या बळावर देशात सत्ता येत नाही- माजी मंत्री सदाभाऊ खोत

दिल्लीमध्ये राज्यातील नेते राजकीय भेटीसाठी ये-जा करत असतात, मात्र चार-पाच खासदारांवर केंद्रात सत्ता येत नसते. लग्नाचा मांडव उभारणी करताना देखील जास्त टेकू असतात, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत
माजी मंत्री सदाभाऊ खोत
author img

By

Published : Jul 19, 2021, 10:38 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - दिल्लीमध्ये राज्यातील नेते राजकीय भेटीसाठी ये-जा करत असतात, मात्र चार-पाच खासदारांवर केंद्रात सत्ता येत नसते. लग्नाचा मांडव उभारणी करताना देखील जास्त टेकू असतात, अशी खोचक टीका सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या पाहणी दौर्‍यासाठी पंढरपूर येथे आले असता, त्यांनी यावेळी बोलताना सरकारसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे.

माजी मंत्री सदाभाऊ खोत

काही नेते स्वतःहून देशाच्या नेत्यांना भेटत असतात, -

काही नेते स्वतःहून देशाच्या नेत्यांना भेटत असतात. त्यानंतर दिखाऊपणा करत साहेबांचा सल्ला मागितला होता, म्हणून बोलावले होते, असे बाहेर माध्यमांसमोर सांगितले जात असल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी मोदी यांच्या भेटीवरून नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली. तसेच कोरोना विषाणू बाबत महाविकास आघाडी सरकारने योग्य नियोजन न केल्यामुळे ऐतिहासिक परंपरेची वारी खंडित झाली आहे. कोरोनाची नियमावली तयार करून वारी होऊ शकत होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकऱ्यांना विठुरायाला भेटू द्यायची नाही, अशी भूमिका घेतली असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

चार खासदारांच्या बळावर देशात सत्ता येत नाही
पवार आणि पंतप्रधान मोदी भेट

राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस ही अली बाबा चाळीस चोर यांची टोळी..

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. महाविकास आघाडी सरकारकडून कोणत्याही कारणासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यातील सर्व आरक्षणाच्या प्रश्नांबाबतही केंद्राकडे बोट दाखवताना दिसत आहे. राज्य सरकारला शेतकरी व शेतमजुरांना फक्त लुटायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस महाविकास आघाडी सरकारमधील अलीबाबा चाळीस चोरांची टोळी आहे, त्यात आता शिवसेनाही जाऊन बसली असल्याची टीका खोत यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.