सोलापूर - राज्यात असलेले 200 साखर कारखाने व त्यांचे वजन काटे हे संगणकीकृत ( Computerize sugar factories and weighing forks ) करा. ही प्रमुख मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना 7 नोव्हेंबर 2022 रोजी शेतकऱ्यांना घेऊन साखर आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली ( Raju Shetty press conference ) आहे.
परतीच्या पावसाचा राज्यात धुमाकूळ : राज्यातील साखर कारखाने हे शेतकऱ्याचे ऊस वजन करून घेताना काटामारी करतात. असा गंभीर आरोप यावेळी राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे.राज्याचे अनुभवी कृषी मंत्री यांनी ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत अब्दुल सत्तार यांना राजू शेट्टी यांना टोला लगावला आहे.सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी ( Raju Shetty Founder Swabhimani Farmers Association ) यांनी पत्रकार परिषद घेऊन जहकर केले.
कृषी मंत्र्यांना टोला लगावला : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राज्यातील सर्व शिवार फिरले.परतीच्या पावसाने महाराष्ट्र राज्यातील अनेक शेतकऱ्यांचा मोठा नुकसान झाला आहे.आम्हाला आमच्या अनुभवावर असे वाटतंय की,राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावं.पण राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांना कृषी क्षेत्रातील भरपूर अनुभव आहे,त्यांना असं वाटत आहे की,ओला दुष्काळाची गरज नाही.असा टोला राजू शेट्टी यांनी कृषी मंत्री यांना लगावला आहे.
मविआचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सोलापुरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडी सरकारचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी सडकून टीका केली. आणि सध्याच्या सरकारने देखील 700 शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे. म्हणून आम्ही महाविकास आघाडी आणि भाजप पुरस्कृत सरकार दोन्ही कडे जाणार नाही असा खुलासा राजू शेट्टी यांनी केला आहे.