ETV Bharat / state

गॅस सिलिंडरला गळफास देत गॅस दरवाढीचा निषेध; युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

एकाच महिन्यात सलग चार वेळा घरगुती वापराच्या गॅस दरात वाढ केली आहे. याचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात गॅस टाकीला गळफास देत दरवाढीचा निषेध केला.

Youth Congress protest
Youth Congress protest
author img

By

Published : Mar 2, 2021, 2:58 PM IST

Updated : Mar 2, 2021, 3:11 PM IST

सोलापूर - वाढत्या महागाई विरोधात सोलापूर युवक काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. एकाच महिन्यात सलग चार वेळा घरगुती वापराच्या गॅस दरात वाढ केली आहे. याचा निषेध करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात गॅस टाकीला गळफास देत दरवाढीचा निषेध केला. सर्वसामान्य महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. केंद्र सरकार किंवा मोदी सरकारने ही दरवाढ मागे घेऊन भारतीय जनतेला दिलासा द्यावा, अशी देखील मागणी केली. अन्यथा भविष्यात तीव्र जनआंदोलन उभे करू, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

एकाच महिन्यात 125 रुपयांची गॅस दरवाढ -

फेब्रुवारी महिन्यात सलग चार वेळा घरगुती वापरातील गॅसची दरवाढ झाली आहे. 4 फेब्रुवारी रोजी 25 रुपयांची वाढ झाली होती. तर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली. तर पुन्हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस 25 रुपयांची वाढ करण्यात आली. मार्चच्या पहिल्याच दिवशी आणखीन 25 रुपये वाढ झाली आहे. फेब्रुवारी या एकाच महिन्यात 125 रुपयांनी गॅस दरवाढ झाली आहे.

सोलापुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
सर्वसामान्य नागरिकांना जबरदस्त फटका -

गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. पण सोमवारी सिलिंडरचे दर तबल 25 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. एकीकडे डिझेलच्या दरवाढीमुळे मालवाहतूक महागली आहे. परिणामी भाज्या, अन्न धान्य महाग होत आहेत. या महागाईचा सर्वसामान्य नागरिकांना व मध्यम वर्गीय नागरिकांना जबरदस्त फटका बसत आहे.

आधुनिक काळात पारंपरिक चूल पेटवण्याची वेळ -

केंद्र सरकार सबसिडी सतत कमी करत असून त्यामुळे घरगुती वापराचे गॅस सिलिंडर महाग होत आहे. या आधुनिक युगात पुन्हा जुन्या काळातील पारंपरिक चूल पेटवून स्वयंपाक करण्याची वेळ महिलांवर आली आहे. अनेक नागरिक गॅस सिलिंडर घेणे बंद करत आहेत. ग्रामीण भागातील अनेक जणांनी चुली पेटवल्या आहेत.

Last Updated : Mar 2, 2021, 3:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.